Sonali Phogat : टिकटॉकमधून सोनालीची कोट्यवधींची कमाई, इतक्या संपत्तीची होती मालकीण

सोनाली फोगाट यांच्या निधनामुळे राजकीय आणि बॉलिवूड विश्वात शोककळा

Updated: Aug 23, 2022, 06:49 PM IST
Sonali Phogat : टिकटॉकमधून सोनालीची कोट्यवधींची कमाई, इतक्या संपत्तीची होती मालकीण title=

Sonali Phogat Career and Lifestyle : टिकटॉक स्टार (Tiktok Star) आणि भाजप (BJP) नेत्या सोनाली फोगट यांचं गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. सोनाली फोगट त्यांच्या काही कर्मचाऱ्यांसोबत गोव्यात गेल्या होत्या. सोनाली फोगाट यांच्या निधनामुळे राजकीय आणि बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली आहे.

सोनाली फोगाट यांनी 2019 मध्ये भाजपाच्या तिकिटावर आदमपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. पण सोनाली चर्चेत आली ती तिच्या टिकटॉक व्हिडिओमुळे. सोनालीने बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. 

सोनाली फोगाट यांचा जन्म 1979 मध्ये हरियाणाच्या हिसारमध्ये झाला. हिसारच्या विद्या देवी जिंदाल शाळेतून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. काही वर्षांपूर्वी सोनाली फोगाट यांच्या पतीचं निधन झालं त्यानंतर त्या आपल्या मुलीसोबत रहात होत्या. टिकटॉकवर सोनाली यांचे असंख्य फॉलोअर्स होते. टिकटॉकच्या माध्यमातून त्यांनी कोट्यवधींची कमाई केली होती. 

सोनाली फोगाट यांची कारकिर्द
सोनाली फोगाट 2006 मध्ये दूरदर्शनमधल्या एका हरियाणवी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर अँकर म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 2016 मध्ये त्यांनी एका टिवी कार्यक्रमातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली. सोनाली फोगाट यांचे पती संजय फोगाट भाजप नेता होते. संजय फोगाट यांचा संशयास्पद मृत्यू झाला.

पतीच्या मृत्यनंतर सोनाली फोगाट यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपा महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. बिग बॉस 14 मध्ये सोनाली सहभागी झाल्या होत्या. याशिवाय वेब सीरीज आणि म्यूझिक व्हिडिओतही दिसल्या होत्या.
 
सोनाली फोगाट यांचं अलिशान घर आणि गाड्या
सोनाली फोगाट हिसारमधल्या संत नगर इथं रहात होत्या. इथं त्यांचं अलिशान घर आहे. घराव्यतिरिक्त सोनाली यांच्या नावावर हिसारमधल्या गंगवा गावात 117 एकर जमीन आहे. तर त्यांच्याकडे ब्लॅक कलरची XUV कार आहे.

सोनाली फोगाट यांची कमाई
सोनाली फोगाट एका फिल्मसाठी 20 ते 25 लाख रुपये मानधन घेत होत्या. तर बिगबॉसमधून त्यांनी प्रत्येक एपिसोडसाठी 80 हजार रुपये घेतल्याची माहिती आहे.

सोनाली फोगाट कोट्यवधी रुपयांची मालकीन होती. सोनाली फोगटकडे 25 लाख 61 हजार रुपयांची स्थावर तर  2 कोटी 48 लाख 50 हजार रुपयांची जंगम मालमत्ता सोडली आहे.