पतीच्या मृत्यूनंतर Sonali Phogat च्या 'या' वक्तव्याने माजली होती खळबळ

टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचं निधन झालं आहे. 

Updated: Aug 23, 2022, 06:24 PM IST
पतीच्या मृत्यूनंतर Sonali Phogat च्या 'या' वक्तव्याने माजली होती खळबळ title=

मुंबई : टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगट यांचं निधन झालं आहे. सोनाली फोगट यांचं गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सोनालीने अचानक जग सोडून गेल्याची बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. सोनाली फोगटने वयाच्या ४२ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. सोनालीचे पती संजय फोगट यांचं 6 वर्षांपूर्वी निधन झालं, त्यानंतर तिला खूप भीतीदायक टप्प्यातून जावं लागलं.

वास्तविक, सोनाली फोगट देखील सलमान खानच्या बिग बॉस 14 शोचा भाग आहे. सोनाली बिग बॉसच्या घरातील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक होती. बिग बॉसच्या घरात तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना सोनाली खूप रडली. शो दरम्यान, तिने सांगितलं की, ती अशा कुटुंबातील आहे जिथे महिलांना बाहेर जाण्याची परवानगी देखील नाही. सोनाली म्हणाली होती की, तिच्या पतीच्या निधनानंतर एकट्या महिलेसाठी आयुष्य जगणं किती कठीण असतं याची मला जाणीव झाली.

बिग बॉसच्या घरातील तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना सोनाली पुढे म्हणाली की, लोकांना तिने घरात बसावं असं वाटतं. इतकंच नाही तर लोकं तिच्याकडे चुकीच्या नजरेने बघायचे आणि अयोग्य गोष्टीही बोलायचे. सोनालीने असंही सांगितलं होतं की, पतीच्या निधनानंतर अनेक महिने ती फक्त रडत राहिली. तिला कोणतंही काम करावंसं वाटायचं नाही.

'केलं होतं मेंटली टॉर्चर'
आपला मानसिक छळ होत असल्याचंही तिने सांगितलं, पण आपल्या मुलीला पाहून धीर आला. संकटांना तोंड देत तिने आपल्या मुलीला एकटीने वाढवलं. सोनालीने सांगितलं होतं की, जेव्हा तिने अभिनय क्षेत्रात करिअरला सुरुवात केली तेव्हा कोणीही तिच्या पाठीशी उभं नव्हतं. राजकारणात पाऊल ठेवताना तिचे पती नेहमीच तिच्या प्रत्येक पावलावर सोबत राहिले. पण पतीच्या निधनानंतर ती पूर्णपणे तुटली होती.