Sonali Kulkarni Apologises On Calling Indian Women Lazy : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा (Sonali Kulkarni) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत सोनाली ही भारतीय मुलींना आळशी असल्याचे म्हणताना दिसली. सोनालीनं केलेल्या या वक्तव्यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं. सोनालीनं महिलांचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर अनेकांनी केल्या. दरम्यान, सततच्या ट्रोलिंगवर सोनालीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत उत्तर दिलं आहे.
सोनालीनं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्य सोनालीनं एक पत्र शेअर केलं आहे. या पत्रात सोनाली म्हणाली, 'ज्या प्रकारचा प्रतिसाद मला मिळाला आहे ते पाहून मी भारावून गेले आहे. ज्या प्रकारे मीडियानं हे प्रकरण हाताळलं त्यासाठी मी मीडियाची आभारी आहे. एक महिला असण्याच्या नात्यानं मला तुम्हाला सांगायचे आहे की मला कोणत्याही स्त्रिला दुखवायचे नव्हते. माझा असा काही हेतू नव्हता. तुम्हाला सगळ्यांना या विषयी जे वाटलं तुमचं मत किंवा मग पाठिंबा ते सगळं माझ्यापर्यंत पोहोचलं आहे, त्यासाठी मी तुमचे आभार मानते. यापुढे देखील अशीच हसत-खेळत आपण कोणत्याही विषयावर चर्चा करू अशी आशा करते.'
— sonalikulkarni (@sonalikulkarni) March 18, 2023
पुढे सोनाली म्हणाली, मी फक्त स्त्रियांनाच नाही तर संपूर्ण मानवजातीला पाठिंबा देण्याचाा प्रयत्न करत आहे. जर आपण महिलांनी एकमेकांनसोबत आपली व्हरनेबल बाजू एकत्र सांभाळात राहिलो तर नक्कीच एक सुंदर आणि आनंदी समाज निर्माण करू शकू. नकळतपणे जर मी कोणाच मन दुखावलं असेल तर मी त्यासाठी माफी मागते. काही गोष्टी या ब्रेकिंग न्यूज किंवा मग हेडलाईन्समध्ये येण्यासाठी करणं हे मला कधीच पटत नाही आणि मी तशी नाही. मी आशावादी आहे. आयुष्य हे खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही दिलेल्या पाठिंबा आणि दाखवलेल्या संयमाचे खूप खूप आभार. या संपूर्ण प्रकरणातू मला खूप काही शिकायला मिळालं.
हेही वाचा : 'पैसे कमावणारा नवरा हवा...' मुलींच्या या इच्छेत गैर काय? सोनालीच्या 'त्या' व्हिडीओवर Urfi Javed चं उत्तर
खरंतर सोनालीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. त्यात सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदचे देखील नावं आहे. तिनं देखील सोनालीला ट्रोल केलं होतं. तर दुसरीकडे अनेकांनी सोनालीला पाठिंबा दिला. सोनालीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. इतकंच काय तर त्या व्हिडीओमध्ये सगळीकडे एकच खळबळ उडाली होती.