'मैं झुकेगा नही ...', सोनालीच्या गृहप्रवेशावेळी पतीनं दिली तंबी, पाहा Video

मराठमोळ्या अप्सरेसाठी पतीचा खास अंदाज, पाहून तुम्ही म्हणाल क्या बात...!   

Updated: Aug 23, 2022, 01:40 PM IST
'मैं झुकेगा नही ...', सोनालीच्या गृहप्रवेशावेळी पतीनं दिली तंबी, पाहा Video  title=

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या मेहेंदी, हळद आणि लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सोनालीने 2021 मध्ये दुबईमध्ये रजिस्टर लग्न केलं. तेव्हा देखील अभिनेत्री लग्नाचे अविस्मरणीय क्षण सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले. पण लग्नाच्या एक वर्षानंतर सोनालीने मोठ्या थाटात लग्न केलं. लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी पुन्हा लंडनमध्ये मराठमोळ्या पद्धतीने विधीवत लग्नगाठ बांधली. अभिनेत्रीच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

नुकताच सोनालीने एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये सोनालीचा पती कुणाल उखाणा घेताना दिसत आहे. लग्नझाल्यानंतर सोनालीचं गृहप्रवेश होताच नातेवाईकांनी कुणालला उखाणा घेण्यासाठी आग्रह केला. 

त्यानंतर कुणाल सोनालीसाठी खास नाव घेतो. ‘लग्न झालं दणक्यात, लग्नात होता ढोला-बाजा, सोनालीचं नाव घेतो…मै झुकेगा नही साला’ असं हटके नाव घेतो. पुष्पा स्टाईलमध्ये नाव घेतल्यानंतर सोनाली देखील अत्यंत आनंदी झाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकर यांचा 2 फेब्रुवारी 2020  रोजी दुबईत साखरपुडा पार पडला होता. त्यानंतर 7 मे 2021 रोजी ते दोघेही अत्यंत साध्या पद्धतीने विवाहबंधनात अडकले होते.  

महत्त्वाचं म्हणजे सोनालीच्या लग्नाचे अविस्मरणीय क्षण प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पहायला मिळत आहेत. सध्या सर्वत्र सोनाली आणि कुणालच्या लग्नाच्या फोटो आणि व्हिडीओची चर्चा रंगत आहे.