आयुष्य खूप अस्थिर आहे म्हणत सोनाली ला रडू कोसळले !

सोनाली सांगते ऐका चा नवीन पॉडकास्ट !

Updated: May 8, 2020, 05:29 PM IST
आयुष्य खूप अस्थिर आहे म्हणत सोनाली ला रडू कोसळले ! title=

मुंबई : सध्या  कोविड लॉक डाउन मध्ये आज आपल्याला आपले जवळचे मित्र मैत्रिणी यांना भेटायला सुद्धा मिळत नाही. पण आपल्या आयुष्यात अशा अनेक जवळच्या व्यक्ती असतात ज्यांना आपण विसरून जातो किंवा त्या आपल्यापासून एवढ्या लांब जातात की त्यांच्याशी आपल्याला कोणताच संबंध ठेवता येत नाही.

त्या लोकांनी एखाद्या काळात आपल्याला प्रेम दिल असत , माया दिली असते , महत्वाचे सल्ले दिले असतात आणि कदाचित आपणच त्याला महत्व दिलेले नसते . पण कधी ना कधी या सर्व गोष्टींची आपल्याला आठवण होते आणि त्या गोष्टींचे महत्व समजते पण तेव्हा ती वेळ निघून गेली असते. नुकतेच  इरफान खान आणि ऋषी कपूर सारखे दिग्गज कलाकार वेळेआधी सर्वाना सोडून निघून गेले , आणि सोनाली ला तिच्या एका अशाच वेळे आधी सोडून गेलेल्या जवळच्या मैत्रिणीची आठवण आली रडू कोसळले .

या शुक्रवारी ८ मे ला मैत्री किती घट्ट आणि प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाची असते , आणि योग्य वेळी त्या मैत्रीला त्याचे महत्व देणं हे किती छान असतं हे सोनाली कुलकर्णी  हॅशटॅग कन्टेक्ट च्या साहाय्याने तिच्या प्रेक्षकांना हब हॉपर या ऍप वर पॉडकास्ट च्या साह्यायाने सांगणार आहे .सोनाली ची अशी ही  इमोशनल बाजू ऐकण्याची संधी आपल्याला या पॉडकास्टमुळे मिळणार आहे.