किंग कोब्राला किस करणारा हा अजब माणूस आहे तरी कोण? अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

किंग कोब्राला किस करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल.जो पाहून तुम्हीही म्हणाल अरे बापरे हे तर अजबच धाडस

Updated: Apr 16, 2022, 08:42 PM IST
किंग कोब्राला किस करणारा हा अजब माणूस आहे तरी कोण? अंगावर काटा आणणारा व्हिडीओ title=

सोशल मीडिया असं माध्यम आहे जिथे क्षणाक्षणाला काहीतरी हटके, माहितीपर, कधी अगदीच पाणचट पण खळखळून हसवणारे तर कधी अंगाला घाम फोडणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात..असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर झालाय जो पाहून तुम्हीही म्हणाल अरे बापरे हे तर अजबच धाडस..

साप म्हटलं तरी भल्याभल्यांची पाचावर धारण बसते तिथे सर्वसामान्य आपण किस झाड की पत्ती? साप फक्त दिसला तरी अंगाला घाम फुटतो आणि त्यात जर तो साप विषारी असेल तर मग विचारायलाच नको. मात्र, व्हिडीओमधले महाशय चक्क किंग कोब्राला किस करतायत. जगातला सर्वात विषारी साप म्हणजे कोब्रा.

कोब्राने एक दंश केला तरी पाणी मागायच्या आत मृत्यू निश्चित. मात्र कसलीही तमा न बाळगता हे महाशय कोब्राला असे काही किस करताय जणू ती आपली प्रेयसी असावी. प्रेयसीला डोक्यावर कीस करावं तसं पाठीमागून कोब्राच्या डोक्यावर आपले ओठ टेकवत या महाशयांनी किस केलं. 

मग सापाची प्रतिक्रिया काय असेल ओ. सापानेही फुत्कार काढला खरा मात्र मागून किस केल्याने हे महाशय बचावले आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोब्राला किस करणाऱ्या या महाशयांचं नाव आहे ब्रायन बार्सक्झिक..कामासारखंच यांचं नावही जरा अवघड आहे. असे धाडसी कामं करणं हाच यांचा उद्योग. अशाच हिंस्त्र प्राण्यांसोबत असे खेळ करणं यांचा छंद. आता थेट कोब्राला किस करण्यापर्यंतचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय.

तुमच्या मनोरंजनासाठी हा व्हिडीओ फक्त खास तुमच्यासाठी होता. मात्र. असलं धाडस तुम्ही कधी करू नका हेच आवाहन