शत्रुघ्न सिन्हांच्या सुनेवरुन नजर हटेना....सौंदर्याच्या बाबतीत लेक सोनाक्षीला ही टाकलं मागे 

 शत्रुघ्न सिन्हा यांची सून दिसायला इतकी सुंदर आहे की, अनेक अभिनेत्रींना ही मागे टाकेल.

Updated: Feb 9, 2022, 12:53 PM IST
  शत्रुघ्न सिन्हांच्या सुनेवरुन नजर हटेना....सौंदर्याच्या बाबतीत लेक सोनाक्षीला ही टाकलं मागे  title=

मुंबई : बॉलिवूडमधील कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात त्यांच्या चाहत्यांना खूप उत्सुकता असते. सध्या बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती चर्चेत आली आहे. त्यात सोनाक्षी तिच्या वहिनीमुळे सर्वाधिक लक्षवेधून घेत आहे. त्याच झालं असं की सध्या सोनाक्षीचं वहिणी तरुणा अग्रवालसोबत खूप चांगलं बॉण्डिंग आहे. ती बऱ्याचदा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसते.  आज त्यांच्या नात्याबद्दलच जाणून घेणार आहोत. 

सोनाक्षी सिन्हाची वहिनी तरुणा भलेही जास्त प्रसिद्धीच्या झोतात नसेल, पण ती अनेकदा सोनाक्षी सिन्हाच्या पोस्टमध्ये दिसते. सोनाक्षी आणि तरुणा फक्त वहिनीच नाहीत तर बेस्ट फ्रेंड्सही आहेत. सोनाक्षी तिच्या वहिनींना बहिणींप्रमाणेच वागवते आणि तरुणाही सोनाक्षीवर खूप प्रेम करते.

सोनाक्षीचा भाऊ कुश याचे लग्न 2015 मध्ये तरुणा अग्रवालसोबत झाले होते. तरुणा लंडनच्या एका प्रसिद्ध एनआरआय कुटुंबातील मुलगी आहे. भावाच्या लग्नात सोनाक्षी खूप उत्साहात होती. लग्नाचे फोटोही सोनाक्षीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. सोनाक्षीला माहीत होतं की तिला वहिनीच्या रूपात एक मैत्रिण आणि बहीण मिळणार आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा कुशच्या लग्नाला अनेक पाहुणे आणि राजकीय लोक उपस्थित होते, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाने सर्वाधिक चर्चेचा विषय बनवला. कुश आणि तरुणाच्या लग्नात पंतप्रधान मोदीही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले. पीएम मोदींशिवाय अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जया बच्चन, टीना अंबानी, पूनम ढिल्लन यांच्यासह अनेक स्टार्सही दिसले.

अशा परिस्थितीत 2018 साली सोनाक्षीने तिच्या वाहिणीसाठी खास सरप्राईज प्लॅन केला होता. याशिवाय सोनाक्षीने तिच्या वहिनीला सोशल मीडियावर शुभेच्छाही दिल्या.

 शत्रुघ्न सिन्हा यांची सून दिसायला इतकी सुंदर आहे की, अनेक अभिनेत्रींना ही मागे टाकेल. तिचे फोटो समोर येताच व्हायरल होतात. सोनाक्षी सुद्धा तिच्या वहिणीवर खूप प्रेम करते. 

सोनाक्षीने लिहिले - वहिनी तरुणा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या डोळ्यातील चमक कधीही गमावू नका. इतकंच नाही तर सोनाक्षीने संपूर्ण दिवस तिच्या वहिनीसोबत घालवला. सोनाक्षीने इंस्टाग्रामवर एक सुंदर व्हिडिओही शेअर केला आहे.