सोनाक्षी सिन्हानं 2 वर्षांपूर्वीच गुपचूप केला होता साखरपुडा! आता 'तो' फोटो होतोय VIRAL

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Got Engaged 2 Years Back : सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बालचा 2 वर्षांपूर्वीच झाला होता साखरपुडा!

दिक्षा पाटील | Updated: Jun 27, 2024, 01:20 PM IST
सोनाक्षी सिन्हानं 2 वर्षांपूर्वीच गुपचूप केला होता साखरपुडा! आता 'तो' फोटो होतोय VIRAL  title=
(Photo Credit : Social Media)

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Got Engaged 2 Years Back : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल 23 जून रोजी लग्न बंधनात अडकले. कुटुंब आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी रजिस्टर लग्न केलं. पण तुम्हाला माहितीये का? त्या दोघांचा साखरपुडा हा 2 वर्षांपूर्वीच झाला होता. जर तुम्हाला आठवण असेल तर 2022 मध्ये सोनाक्षीनं कोणाचातरी हाथ धरल्याचे असे तीन फोटो शेअर केले होते. त्यानंतर तिचा साखरपुडा झाल्याचे म्हटले जात होते. तर काहींनी ती जाहिरात असल्याचे म्हटले होते. मात्र, सोनाक्षीनं काही सांगितलं नव्हतं. पण आता त्या दोघांचे जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  

सोनाक्षीनं हे फोटो 9 मे 2022 रोजी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले होते. यात सोनाक्षीच्या हातात अंगढी पाहायला मिळाली. तिनं कोणाचातरी हाथ पकडला होता. हे सगळे फोटो शेअर करत सोनाक्षीनं कॅप्शन दिलं की 'माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे... माझं सगळ्यात मोठं स्वप्न पूर्ण होतंय... आणि मला हे स्वप्न तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी खूर उत्सुक आहे. हे इतकं सोपं असले असं मला वाटलं नव्हतं.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हे फोटो पाहिल्यानंतर चर्चा रंगली होती की सोनाक्षीचा साखरपुडा झाला आहे, पण अभिनेत्रीनं खुलासा केला नव्हता की ती व्यक्ती कोण आहे. खरंतर, लोकांनी अंदाज लावला होता की ती व्यक्ती कोण आहे. कारण त्यावेळी त्या दोघांचं रिलेशनशिप हे चांगलंच चर्चेत होतं. दरम्यान, त्यावेळी सोनाक्षीनं जी एन्गेजमेंट रिंग घातली होती. तिच रिंग तिच्या हातात दिसली. त्यात आणखी एक अंगढी दिसते. पण जर तिच्या हातात असलेल्या डायमंड रिंगला नीट पाहिलं तर त्यात ती डायमंड रिंग दिसते. 

हेही वाचा : 'शरद पवारांचा कॉल आला, ते म्हणाले...', नाना पाटेकरांना मिळालेली लोकसभा निवडणुकीची ऑफर?

सोनाक्षी आणि झहीरचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. तेव्हा खुलासा करण्यात आला की ते दोघं गेल्या सात वर्षांपासून सोबत आहेत. सलमान खानच्या पार्टीत पहिल्यांदा त्या दोघांची भेट झाली होती. त्यानंतर ते रिलेशनशिपमध्ये आले. तर जवळपास एकवर्षापासून ते लिव्ह इनमध्ये राहत होते. दरम्यान, त्या दोघांनी रजिस्टर मॅरेज केल्यानंतर मुंबईतील लोकप्रिय रेस्टॉरंट बास्टियनमध्ये रिसेप्शन पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.