सोनाक्षी सिन्हा दिसते 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीसारखी; अभिनेत्रीची आई म्हणूनही पसरली होती अफवा

Sonakshi Sinha Reena Roy: सोनाक्षी सिन्हा आणि रीना रॉय यांची अनेकदा चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. त्यांचा चेहरा हा एकमेकांशी फार मिळता जुळता आहे अशी त्यांची ख्याती होती परंतु यावेळी रीना रॉय यांनीही शंका दूर केली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 5, 2023, 07:20 PM IST
सोनाक्षी सिन्हा दिसते 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीसारखी; अभिनेत्रीची आई म्हणूनही पसरली होती अफवा title=
sonakshi sinha and reena roy look alike photos went viral on instagram

Sonakshi Sinha Reena Roy: बॉलिवूड ही सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांची चर्चा त्यांच्या सौंदर्यामुळे तर रंगतेच परंतु त्याचसोबत या अभिनेत्री दुसऱ्या अभिनेत्रींसारख्याच दिसतात. अशीही बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाते. सोनाक्षी सिन्हा या अभिनेत्रीच्या बाबतीतही असंच काहीसं झालं होतं. सोनाक्षी सिन्हा ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची जोरात चर्चा रंगताना दिसते. तिच्या सौंदर्याचे सर्वच जणं फॅन्स आहेत. दबंग या चित्रपटातून ज्येष्ठ अभिनेते शत्रुध्न सिन्हा यांची मुलगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनं पदार्पण केले होते. त्यानंतर तिच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे सर्वच जणं फॅन्स झाले होते. तुम्हाला महितीये का की अशा एक ज्येष्ठ अभिनेत्री आहेत ज्याचा चेहरा अगदी सोनाक्षी सिन्हा हिच्यासारखाच दिसायच्या. त्यांच्या तरूणपणातले फोटो हे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. 

त्यावरून तुम्हाला लक्षात येईलच. सध्या पुन्हा एकदा त्या दोघींचे फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

आम्ही बोलत आहोत ज्येष्ठ अभिनेत्री रीना रॉय यांच्याबद्दल. तरूणपणातल्या रीना रॉय या हूबेहूब सोनाक्षी सिन्हा हिच्यासारख्याच दिसायच्या. डोळ्यांपासून ते नाक-ओठांच्या लकबीपर्यंत त्या दोघींचा चेहरा हा मिळता जुळता होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार अनेकांना असंही वाटायचं की रीना रॉय या सोनाक्षी सिन्हा यांच्या आई आहेत. अशी अफवा ही तुम्ही देखील ऐकली असेलच. 

रीना रॉय यांनी फर्स्ट पोस्टला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमधून सांगितले होते की हा फक्त निव्वळ एक योगायोग आहे. असं अनेकदा होतं जसं की जितेंद्र यांची आई आणि त्यांच्या आईचा चेहरा हा फार सारखा आहे. तेव्हा असं वाटतं की त्या दोघी बहीणच आहेत की काय. 

सोनाक्षीनं एका मुलाखतीत सांगितले होती की, जेव्हा एका व्यक्तीचा असा एक इतिहास आहे. तेव्हा मी या गोष्टीवर जास्त विचार करत नाही. मी या गोष्टींवर लक्षही देत नाही. ही फक्त एक हेडलाईन बनू शकते. काहींना फक्त हे एक गॉसिप वाटू शकतं. पण माझ्यासाठी माझा परिवार हा महत्त्वाचा आहे. 

तेव्हा त्यांचे रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे अफेअर होते. जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. जेव्हा मी मोठी झाली तेव्हा मला गोष्टी समजू लागल्या होत्या. मी काही माझ्या वडिलांना शिक्षा देणार नाही जे त्यांनी काही वर्षांपुर्वी केले आहे.