सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये ७ वर्ष पूर्ण...

सोनाक्षी सिन्हाला बॉलिवूडमध्ये ७ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने तिने सांगितले की, प्रेक्षकांचे प्रेम व कौतुक यामुळे असे वाटते की, मी अजून सात दशकं काम करू शकेन.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 12, 2017, 10:57 AM IST
सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये ७ वर्ष पूर्ण...  title=

मुंबई : सोनाक्षी सिन्हाला बॉलिवूडमध्ये ७ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने तिने सांगितले की, प्रेक्षकांचे प्रेम व कौतुक यामुळे असे वाटते की, मी अजून सात दशकं काम करू शकेन. २०१० मध्ये सुपरस्टार सलमान खान याच्यासोबत 'दबंग' या चित्रपटातून सोनाक्षीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 

म्हणूनच रविवारी ट्विटरवरून तिने सलमान खान, अरबाज खान आणि अभिनव कश्यप यांचे आभार मानले. सोनाक्षीने ट्वीट करताना लिहिले की, "दबंगला सात वर्ष म्हणजे सोनाक्षीला सात वर्ष. म्हणून सलमान खान, अरबाज खान आणि अभिनव कश्यप यांना धन्यवाद." त्याचबरोबर तिने आपल्या फॅन्सना देखील धन्यवाद दिले आहेत. 

तिने लिहिले की, "प्रेम आणि शुभेच्छांसाठी सगळ्यांचे आभार. यामुळेच माझ्यात विश्वास निर्माण झाला की मी अजून ७० वर्ष काम करू शकेन." सोनाक्षी सध्या तिच्या १६ व्या चित्रपटाच्या म्हणजेच 'इत्तेफाक' साठी तयारी करत आहे. या चित्रपटाची निर्मिती रेड चिलीज इंटरटेन्मेन्ट आणि धर्मा प्रॉडक्सन करत आहेत. तर दिग्दर्शन अभय चोप्रा यांचे असेल. यात सोनाक्षीबरोबरच अक्षय खन्ना आणि सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहेत.