मुंबई : अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या भाजप नेत्या स्मृती इराणी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. नवा लूक असो, एखाद्या सणाच्या दिवशी केलेली पोस्ट असो किंवा मग आणखी काही. स्मृती इराणी यांनी पोस्ट केली आणि ती चर्चेत आली नाही, असं फार कमीच होतं. पण, नुकतीच त्यांनी एक पोस्ट केली आणि त्याचे परिणाम मात्र वेगळ्याच प्रकारे दिसून आले.
फॉलोअर्सना केलं आवाहन...
एक फोटो पोस्ट करत स्मृती इराणी यांनी फॉलोअर्सना मास्क वापरण्याचं आवाहन केलं. तीन फोटोंचा कोलाज असणाऱ्या या एका फोटोला कॅप्शन देत त्यांनी लिहिलं, 'मंडे मंत्रा, कानातले, नाकातलं घाला किंवा घालू नका पण मास्त नक्की घाला.'
कोरोनाचं संकट अद्यापही कायम आहे, पण नारिकांमध्ये मात्र याबाबत फारसं गांभीर्य दिसत नसल्यामुळे सध्या अनेक नेतेमंडळी आणि सेलिब्रिटी त्यांच्या परीनं कोरोनाबाबत जनजागृती करताना दिसत आहेत. स्मृती इराणी यांनीही याचीच पुनरावृत्ती मास्कचा वापर करण्यास सांगितलं. पण, फॉलोअर्सचं लक्ष भलतीकडेच गेलं.
फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या स्मृती इराणी यांचं घटलेलं वजन फोटोतही कळून आलं. ज्यावर प्रतिक्रिया देत त्यांच्या या ट्रान्सफॉर्मेशनची अनेकांनीच प्रशंसा केली. 'तुमचं हे ट्रान्सफॉर्मेशन फारच प्रेरणादायी आहे', असं लिहित नेटकऱ्यांनी त्यांच्या या लूकला तुफान लाईक्स दिल्या आणि कमेंट करत आपल्या प्रतिक्रिया दिल्या.