स्मिता पाटीलच्या मुलाने केला 'ही' च्याशी साखरपूडा!

अभिनेता, राजकीय नेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Jan 23, 2018, 08:18 PM IST
स्मिता पाटीलच्या मुलाने केला 'ही' च्याशी साखरपूडा! title=

मुंबई : अभिनेता, राजकीय नेते राज बब्बर आणि अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतिक बब्बर. याने आपली गर्लफ्रेंड सान्या सागरसोबत साखरपूडा केला. दोघांना वसंती पंचमीच्या शुभ मुहुर्तावर साखरपूडा केला.

कोण आहे सान्या ?

सान्या आणि प्रतीक एकमेकांना गेल्या ८ वर्षांपासून ओळखतात. मात्र दोघांच्या नात्याची सुरूवात २०१७ मध्ये झाली. सान्या एक लेखिका आहे. त्याचबरोबर बॉलिवूडमधील उदयोन्मुख चेहरा म्हणून तिच्याकडे पाहिले जाते.

बागी २ मधून प्रतिकचे कमबॅक

सुमारे ३ वर्षांनंतर प्रतीक बागी २ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. या चित्रपटात तो नेगेटिव्ह भूमिकेत दिसेल. प्रतिक बब्बरचा साखरपूडा...

तिच्यापूर्वी या अभिनेत्रीशी प्रतिकचे अफेअर

सान्या पूर्वी प्रतिक अभिनेत्री एमी जॅक्सनसोबत रिलेशनमध्ये होता. मात्र नंतर दोघांचा ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर प्रतिकला डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. त्यातच त्याला ड्रग्सचे व्यसन लागले. मात्र त्यातून बाहेर पडत तो आता सामान्य जीवन जगत आहे.