सतार वादक देबू चौधरी यांच्या पाठोपाठ मुलगा प्रतीक चौधरी यांचं कोरोनामुळे निधन

अनेकांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली

Updated: May 7, 2021, 03:22 PM IST
सतार वादक देबू चौधरी यांच्या पाठोपाठ मुलगा प्रतीक चौधरी यांचं कोरोनामुळे निधन  title=

मुंबई : सिनेमा, टीव्ही आणि म्युझिक इंडस्ट्रीमधून एका पाठोपाठ वाईट बातमी समोर आली आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. लोकप्रिय सतार वादक प्रोफेसर प्रतीक चौधरी यांचं निधन झालं आहे. आज दुपारी त्यांनी अडीच वाजता अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, कोविड-19 मुळे त्यांचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच त्यांचे वडिल पंडित देबू चौधरी यांचं कोरोनामुळेच निधन झालं आहे. 

अनेकांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. पवन झा यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीक चौधरी यांनी वयाच्या ४९व्या वर्षी निधन झाले. त्यांनी गुरु तेग बहादुर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

‘ज्येष्ठ सतारवादक पंडीत देबू चौधरी यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आयसीयूमध्ये प्रतीक यांच्यावर उपचार सुरु होते. काल प्रतीक यांनी अखेरचा श्वास घेतला’ या आशयाचे ट्वीट पवन झा यांनी केले आहे.

कोरोना काळ बनून आला. गेल्या काही दिवसांत सिने जगतातून अनेक दुःखद घटना समोर आल्या. या काळात काही कलाकारांनी आपल्या भावाला गमावलं तर काहींनी आपल्या पालकांना. गेल्या 24 तासांत 4 कलाकारांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. साऊ सिनेम जगतात पांडू, श्रीप्रदा आणि मराठी सिनेसृष्टीतून अभिलाषा पाटील तर अजय फिल्म एडिटर यांचं निधन झालं आहे