मुसलमानांच्या आरक्षणावर मोदींचं काय म्हणणं? संजय राऊतांचा थेट सवाल

Sanjay Raut : झी 24तासला दिलेल्या Exclusive मुलाखतीत काय म्हणाले संजय राऊत? पाहा देशाच्या राजकारणातील मोठी बातमी. एनडीएडी साथ देणाऱ्या नितीश कुमार यांच्याबद्दलही म्हणाले...   

सायली पाटील | Updated: Jun 8, 2024, 11:00 AM IST
मुसलमानांच्या आरक्षणावर मोदींचं काय म्हणणं? संजय राऊतांचा थेट सवाल  title=
exclusive political news sanjay raut on muslim reservation targets pm modi over his stand latets political update

Sanjay Raut : केंद्रात भाजपप्रणित एडीएची सत्ता येत असतानाच विरोधी पक्षातील नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी यांच्या काही भूमिकांवरल जाहीरपणे प्रश्न उपस्थित केले आहेत. (INDIA Alliance) इंडिया आघाडी सत्तेवर आल्यावर मुसलमानांना आरक्षण देतील, अशा प्रकारे मोदींनी हिंदुंना चिथवण्याचा प्रयत्न केला. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार मुसलमानांना आरक्षण देण्याच्या बाजुने आहेत, यावर मोदींचं म्हणणं काय? असा सवाल खासदार संजय राऊतांनी केला. झी 24तासच्या मुलाखतीत ते बोलत होते. 

'नरेंद्र मोदी किती ढोंगी आहेत... नरेटीव्ह नरेटीव्ह म्हणताय ना? इंजिया आघाडी, काँग्रेस सत्तेवर आली तर ते मुस्लिमांना आरक्षण देतील अशी त्यांनी हिंदूंना चिथवण्याची भाषा केली. आज चंद्राबाबू नायडू आणि खुद्द नितीश कुमार हे मुसलमानांना आरक्षण देण्याच्या बाजूने असून, आपआपल्या राज्यांमध्ये त्यांची ती भूमिका आहे. याच्यावर मोदींचं म्हणणं काय? हिंदुत्ववादी मोदी म्हणतात ना स्वत:ला? आम्ही सत्तेवर आलो, तर मुसलमानांना आरक्षण देतील हे, ही भाषा एखाद्या प्रधानमंत्र्यांना शोभते का?' हा बोचरा सवाल त्यांनी केला. 

मुसलमान या देशाचे नागरिक आहेत... आहेत ना? असा प्रतिप्रश्न करत संजय राऊत यांनी अगदी जाहीरपणे पंतप्रधानपदी विराजमान होणाऱ्या नरेंद्र मोदी यांना थेट सवाल केला. झी 24 तासला दिलेल्या विशेष मुलाखती  राऊतांन इतरही अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यामध्ये ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सच्या माध्यमातून 10 वर्षांपासून आर्थिक आतंकवाद माजवला,  या त्यांच्या गंभीर आरोपानं सर्वांच्या नजरा वळवल्या. 

हेसुद्धा वाचा : Rahul Gandhi : पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, तर राहुल गांधींवर सोपवण्यात येणार 'ही' जबाबदारी 

दरम्यान, तिथं लोकसभा निवडणुकीनंतर आता शिवसेनेच्या शिंदे गटानंही मोर्चेबांधणीची तयारी सुरु केलेली असताना त्यांच्या गटातून अनेक आमदार, खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत, असा खळबळजनक दावाही राऊतांनी केला. नुकतीच सूत्रांच्या हवाल्यातून मिळालेली काहीशी अशीच बातमी आणि त्यानंतर राऊतांचं त्यासदंर्भातील वक्तव्य पाहता भविष्यात राज्याच्या राजकारणात पुन्हा धुमश्चक्री माजणार असंच एकंदर चित्र पाहायला मिळालं.