मुंबई : महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री राहिलेले दिवंगत नेते विलासराव देशमुख यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने त्यांचा मुलगा अभिनेता रितेश देशमुख याने त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. रितेशने सोशल मीडियात एक भावूक पोस्ट शेअर केली. रितेशने सोमवारी त्याचे वडील विलासराव देशमुख यांचा एक फोटो ट्विटरवर शेअर केलाय.
या ट्विटमध्ये रितेश म्हणाला की, ‘पाच वर्ष झालीत...तुमची प्रत्येक क्षणी, प्रत्येक तास, प्रत्येक दिवशी आठवण काढली. तूमची खूप आठ्वण येते पापा....’.
It's been 5 years.... have missed you every moment, every hour, everyday. #MissYouPappa pic.twitter.com/FZ2Eopj2eO
— Riteish Deshmukh (@Riteishd) August 14, 2017
विलासराव देशमुख यांचे १४ ऑगस्ट २०१२ मध्ये निधन झाले होते. विलासराव देशमुख हे लोकांचे नेते म्हणून लोकप्रिय होते. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये त्यांना गणलं जात होतं. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने कॉंग्रेसला मोठा धक्का बसला. रितेश नेहमीच आपल्या वडीलांची आठवण अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने करत असतो.