'इक प्यार का नगमा है... 'च्या गीतकारांना ५० वर्षांनंतर भेटली प्रेयसी

 ८४ वर्षीय आनंद यांना तब्बल ५० वर्षांनंतर त्यांची प्रेयसी पुन्हा भेटली आहे. 

Updated: Nov 25, 2019, 12:59 PM IST
'इक प्यार का नगमा है... 'च्या गीतकारांना ५० वर्षांनंतर भेटली प्रेयसी   title=

मुंबई : 'इक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और जिंदगी और कुछ भी नही...' हे गाणं प्रदर्शित झालं आणि प्रेमचा एक नवीन दाखला चाहत्यांसमोर उभा राहिला. त्याकाळी प्रचंड गाजलेलं हे गाणं आजही तरूणांच्या पसंतीचं गाणं आहे. प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांच्या शब्दात हे गाणं बाधंलं गेलं. प्रेमावर साकारण्यात आलेल्या या गाण्यामागे फार मोठा इतिहास आहे. आयुष्यातलं पहिलं प्रेम कोणीही विसरू शकत नाही. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत हे शक्य नाही. 

असचं काही झालं आहे गीतकार संतोष आनंद यांच्यासोबत. एकापेक्षा एक गाणं लिहणाऱ्या ८४ वर्षीय आनंद यांना तब्बल ५० वर्षांनंतर त्यांची प्रेयसी पुन्हा भेटली आहे. यासंदर्भात खुद्द आनंद यांनी केला आहे. 'दो पल की जीवनसे एक उम्र चुरानी है' ही ओळ त्यांच्याच गाण्यातली आहे आणि त्यांनी खरचं त्यांच्या आयुष्यातले ते दिवस पुन्हा काबीज केले आहेत.

आनंत पाटणामध्ये एका कार्यमासाठी उपस्थित होते. तेव्हा त्यांनी तब्बल ५० वर्षांनंतर भेटलेल्या प्रेयसी बद्दल खुलासा केला आहे. 'एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और जिंदगी और कुछ भी नही...' हे गाणं ज्या मुलीवर त्यांनी साकरलं ती आज त्यांच्यासोबत आहे. त्यांची प्रेयसी पुण्यात राहते आणि ते रोज फोनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असतात.

'कोणत्याही वयात व्यक्तीने वयाकडे लक्ष न देता फक्त जिद्दीवर आयुष्य जगलं पाहिजे. जे आज आनंदात जगत आहेत ते म्हणजे फक्त जिद्दीवर आणि ऊर्जेच्या जोरावर.' असं मत त्यांनी यावेळेस व्यक्त केलं.