उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना राखीचा सल्ला

राज्यात रंगत असलेल्या राजकारणावर तिने वक्तव्य केलं आहे. 

Updated: Nov 25, 2019, 11:40 AM IST
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना राखीचा सल्ला  title=

मंबई : बॉलिवूडची 'ड्रामा क्विन' राखी सावंत सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. नुकताच तिने फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिचा हा व्हिडिओ साध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती चक्क शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना सल्ला देताना दिसत आहे. राज्यात रंगत असलेल्या राजकारणावर तिने वक्तव्य केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Aagye modi ji mai hu aadhe maa

 

व्हिडिओमध्ये ती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना शक्तिशाली म्हणाली आहे. 'मी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सांगितलं होतं  एकमेकांसोबत भांडू नका. मोदीजी खूप शक्तिशाली आहेत आणि तुमच्या भांडणाचा फयदा भाजपने घेतला आहे. माझी मनापासून इच्छा होती तुम्हाला मुख्यमंत्री पदावर पाहण्याची.' असं मत तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले आहे. 

अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी करत शनिवारी सकाळी उप-मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. 

अजित पवारांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. आता राज्या कधी सरकार स्थापन होईल या कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.