मुंबई : नव्वदच्या दशकातील गायक नितीन बाली यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. नितीन बाली आपल्या कारने घरी परत येत असताना त्यांची कार रस्त्याच्या डिव्हायडरला धडकली. बोरिवलीहून मालाडला येत असताना हा अपघात झाला. नितीन बाली हे रिमिक्स गाण्यांसाठी प्रसिद्ध होते, किशोर कुमार यांनी गायलेली अनेक गाणी त्यांनी रिमिक्स केली. यात 'निले निले अंबर पे चाँद जब आये' हे रिमिक्स गाणं सर्वाधिक गाजलं.
नितीन बाली यांची अपघातानंतर पोलिसांनी वैद्यकीय चाचणी घेण्यास रूग्णालयात नेलं. पोलिसांना दारू पिऊन नितीन गाडी चालवत असल्याचं संशय होता, यानंतर नितीन यांच्या चेहऱ्यावर काही टाके पडले.
नितीन बाली यांना हॉस्पिटलमधून घरी जाण्यास डॉक्टरांनी नकार देखील दिला होता, तसेच यावेळी त्यांची पत्नी देखील उपस्थित होती. पण मी ठिक आहे, असं सांगून नितीन बाली यांनी नकार दिला आणि घरी आले.
पण काही तासांनी त्यांच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या आणि नाकातून रक्त येऊ लागलं. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. नितीन बाली यांच्या पश्चात मुलगा आणि पत्नी आहे.
कदाचित गायक नितीन बाली यांनी डोक्याला मार लागल्यामुळे सीटी स्कॅन केला असता, तर ते बचावले असते असं म्हटलं जातं. तेव्हा अपघातानंतर डोक्याचा सीटी स्कॅन करणे आवश्यक असते.