'हम रहे या ना रहे...'; KK च्या अखेरच्या परफॉर्मन्सचा डोळ्यात पाणी आणणारा Video

वयाच्या 53 व्या वर्षी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा गायक कायमचा निघून गेला

Updated: Jun 1, 2022, 09:01 AM IST
'हम रहे या ना रहे...'; KK च्या अखेरच्या परफॉर्मन्सचा डोळ्यात पाणी आणणारा Video  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : Krishnakumar Kunnath म्हणजेच सर्वांचा लाडका गायक केके, एका कार्यक्रमासाठी गेलं असता तिथेच त्याची प्रकृती खालावली. ज्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं. (soinger KK last song Hum Rahe Ya Na Rahe Kal live concert viral video)

केकेच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. वयाच्या 53 व्या वर्षी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा हा गायक कायमचा निघून गेला. 

केकेची अनेक गाणी ऐकत सध्याची तरुणाई लहानाची मोठी झाली. या गाण्यानी कुणाला प्रेम करायला शिकवलं, तर कुणाला प्रेम जगायला. कुणाला मैत्रीच्या नात्यात जीव लावायला शिकवं आणि पाहता पाहता आपण मोठे झालो.

आज हाच केके आपल्यात नाही. त्याचे अखेरचे क्षणही सर्वांच्याच डोळ्यांत पाणी आणून जात आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओध्ये केके 'हम रहे या ना रहे या आएंगे ये पल' हे गाणं गाताना दिसत आहे. 

गाण्याचे बोल आणि केके खुद्द ते समोर गातोय हे पाहताना क्षणार्धासाठीही तो आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाहीये. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. काहींनी तर, हा व्हिडीओ स्टेटसमध्ये ठेवत या गायकाला श्रद्धांजलीही वाहिली आहे.