तिसऱ्या आठवड्यातही 'सिम्बा'ची बॉक्स ऑफिसवर धम्माल

मोठ्या पडद्यावर दमदार कामगिरी केल्यानंतर आता सिम्बाने २५० कोटीचे लक्ष्य गाठण्याचे ठरवले आहे.

Updated: Jan 18, 2019, 11:36 AM IST
तिसऱ्या आठवड्यातही 'सिम्बा'ची बॉक्स ऑफिसवर धम्माल title=

मुंबई: रणवीर सिंह आणि सारा अली खान यांचा सिनेमा सिम्बा सलग तिसऱ्या आठवड्यात सुद्धा कोटींची मजल मारत आहे. मोठ्या पडद्यावर दमदार कामगिरी केल्यानंतर आता सिम्बाने २५० कोटीचे लक्ष्य गाठण्याचे ठरवले आहे. सिनेमाने पहिल्या आठवड्यांतच १५० कोटींचा गल्ला जमवला. सिनेमा प्रेक्षकांना एवढा भावला आहे की सिनेमागृहात पुन्हा तोच सिनेमा बघण्याची इच्छा चाहते व्यक्त करत आहेत. तरण आदर्श यांच्या सांगण्यानुसार शुक्रवारी सिनेमाने २.६० कोटी, शनिवारी ४.५१ कोटी, रविवारी ५.३० कोटी, सोमवारी २.८७ कोटी, मंगळवारी २.२९ कोटी, बुधवारी १.३१ कोटी रुपये कमावले आहेत. अंदाज लावला तर सिनेमा कदाचित २३३ रुपयांपर्यंत मजल मारेल.

 

'केदारनाथ' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खानचा सिम्बा दुसरा सिनेमा आहे. आपल्या प्रेक्षणीय अभिनयाच्या जोरावर साराने चाहत्यांची मने जिंकली आहेत. आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सिम्बाने चाहत्यांच्या मनात घर केले आहे. रोहित शेट्टीच्या हिट सिनेमांच्या यादीत सिम्बा सिनेमाने आपले नाव कोरले. २०१३ मध्ये आलेल्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ने २२७.१३ कोटींचा गल्ला जमवला होता. सिम्बाने सर्व रेकॉर्ड मो़डत २२७.७१ कोटी कमावले आहेत. रोहित शेट्टीचा सिम्बा हा तेलगू सिनेमा 'टेम्पर'चा रिमेक आहे.