साऊथचा कॉमेडी अभिनेता रूग्णालयात दाखल

60 वर्षांचा हा अभिनेता आजही यशाच्या शिखरावर आहे. 

Updated: Jan 18, 2019, 11:06 AM IST
साऊथचा कॉमेडी अभिनेता रूग्णालयात दाखल  title=

मुंबई : साऊथचा एक सिनेमा सोडून प्रत्येक दुसऱ्या सिनेमात विनोदी भूमिका साकारणारा अभिनेता ब्रम्हानंदम यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. ब्रम्हानंदम यांना हृदयाचा त्रास आहे. याकरता त्यांना मुंबईच्या एशियन हार्ट इंस्टिट्यूटमध्ये दाखल करण्यात आलं आहे. यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अजून ब्रम्हानंदम यांची प्रकृती गंभीर आहे. यामुळे त्यांना देखरेखी खाली ठेवण्यात आलं आहे. डॉ रमाकांत पांडाने त्यांची सर्जरी केली आहे. सर्जरीनंतर त्यांच्या तब्बेतीमध्ये हळू हळू सुधारणा होईल. ब्रम्हानंदम यांना रूग्णालयात दाखल केल्याची जशी माहिती समोर आली तशी चाहत्यांनी देवाकडे प्रार्थना करायला सुरूवात केली. चाहत्यांनी लिहिलं आहे की, आम्ही लवकरच तुम्हाला स्क्रीनवर पाहण्यासाठी उत्सुक आहोत. 

ब्रम्हानंदम यांची लोकप्रियता इतकी आहे की, प्रत्येक दिग्दर्शक त्यांना आपल्या सिनेमात घेऊ इच्छितात. हेच कारण आहे त्यांच्या यशाचं आणि तीन दशकांच करिअर असलेल्या ब्रम्हानंदम यांनी 1100 हून अधिक सिनेमात काम केलं आहे. कॉलेजमध्ये असताना ब्रम्हानंदम यांनी अनेक मुलांची मिमिक्री केली आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ठिक नव्हती यावेळी फक्त ही एकच व्यक्ती होती ज्यांनी एमएपर्यंत शिक्षण घेतलं आहे. पण तेलुगु सिनेमातील लोकप्रिय दिग्दर्शकाने त्यांना सिनेमात काम दिल्यानंतर त्यांच संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. दिग्दर्शकाला हे काम इतकं आवडलं की, त्यांना आणखी एक सिनेमा 'चन्ताबाबाई' देण्यात आला. यानंतर या अभिनेत्याने मागे वळून पाहिलं नाही. 

60 वर्षांचा हा अभिनेता आजही यशाच्या शिखरावर आहे. त्यांची लोकप्रियता आजही वाख्याण्याजोगी आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमात जराही कमी झालेली नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य होईल पण एका सिनेमाकरता ब्रम्हानंदम 1 करोड रुपये आकारतात. एका कॉमेडी अभिनेत्याला एवढे रुपये फी मिळणं ही काही सामान्य गोष्ट नाही.
ब्रम्हानंदम 24 तासांत जवळपास 5 लाख रुपये कमावतो. एवढंच नव्हे तर ब्रम्हानंदम यांच्याकडे अनेक लक्झरी गाड्या आहेत. या अभिनेत्याने अभिनयाकरता आतापर्यंत 5 नंदी अवॉर्ड आणि अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच ब्रम्हानंदम यांच नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील नोंदल गेलं आहे.