'सिंबा'च्या अभुतपूर्व यशानंतर लवकरच येणार 'सिंबा 2'

सिनेमात असणार ही स्टारकास्ट 

'सिंबा'च्या अभुतपूर्व यशानंतर लवकरच येणार 'सिंबा 2' title=

मुंबई : रणवीर सिंहच्या 'सिंबा'ने पहिल्याच पाच दिवसांत चांगली कमाई केली आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या सिनेमाने 5 दिवसांत 100 करोड रुपयांची कमाई केली आहे. या भरघोस यशानंतर सिनेमाची स्टारकास्ट आणि संपूर्ण टीम खूप आनंदात आहे. 

'सिंबा'ने बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केल्यानंतर आता सगळीकडे एकच चर्चा होत आहे की, 'रोहित शेट्टी सिंबाच्या सिक्वलचा विचार करणार की नाही?'

रणवीर आणि रोहित शेट्टीचे फॅन्स आता या बातमीची आतुरतेने वाट पाहत आहेत की, रोहित शेट्टी सिंबाचा सिक्वल कधी घेऊन येत आहे? 

तर महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे रोहित शेट्टी या तयारीला लागला देखील आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शेट्टीने सिक्वलवर फोकस केला असून अजय आणि रणवीर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला असणार आहे. 

असं देखील समजत आहे की, रोहितने या सिक्वलची तयारी खूप आधीपासून केली होती. आणि याचनुसार त्याने पहिल्या म्हणजे 'सिंबा' सिनेमाची प्लानिंग देखील केली होती. सिक्वलमध्ये 'सिंघम' अजय देवगनचा मोठा रोल असणार असून तो सिक्वलच्या लीड रोलमध्ये दिसणार आहे. 

या दिग्दर्शकाचे 8 सिनेमे 100 कोटीच्या घरात 

बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा असं झालं आहे की, कोणत्या तरी दिग्दर्शकाचे 8 सिनेमे एकापाठोपाठ 100 करोड रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. सिंबाला प्रदर्शित होऊन 5 दिवस झाले असून हा आठवडा संपायच्या अगोदर 124 करोड रुपयांची कमाई करणार आहे. 

रोहितने आतापर्यंत अनेक सिनेमे अजय देवगनसोबत केले असून 'सिंबा'हा सिनेमा 'सिंघम'च्या पुढील कथा आहे. सिंबामध्ये अजय देवगनचा कॅमिओ रोल असून याचं देखील भरपूर कौतुक झालं.