कॅन्सरशी लढणाऱ्या किरण खेर यांचे हे शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल

बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर ब्लड कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत 

Updated: Aug 13, 2021, 05:22 PM IST
कॅन्सरशी लढणाऱ्या किरण खेर यांचे हे शब्द ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार किरण खेर ब्लड कॅन्सर या गंभीर आजाराशी झुंज देत आहेत आणि उपचारानंतर किरण घरी विश्रांती घेत आहेत. दरम्यान, त्यांचा मुलगा आणि अभिनेता सिकंदर खेर हा त्यांना आनंदी ठेवण्यासाठी नवं नवीन गोष्टी करत राहतो. काही काळापूर्वी त्याने त्याची आई आणि वडील अनुपम खैर यांच्यासोबत एक लाईव्ह सेशन केलं होतं.

सिकंदर खेरने नुकतंच चाहत्यांशी थेट संवाद सत्र केलं. या सत्रात चाहते त्याच्याशी त्याच्या चित्रपटांबद्दल बोलत होते. मग एका चाहत्याच्या विनंतीवरून त्याने गाणं सुरू केलं. सिकंदर खैरचा आवाज ऐकून त्याची आई किरण खैर त्याच्या खोलीत आली.

यानंतर सिकंदरने आपल्या आईची झलक चाहत्यांना दाखवली. चाहत्यांनी अनुपम यांना त्यांचा तब्येतीबद्दल विचारलं. पुढे या लाईव्हमध्ये सिकंदर खैर किरण यांना विचारतो की, बुधवारी रात्री त्याची आई खूप ओरडली. तो किरण खैरला विचारतो की, तु मला एवढं का ओरडलीस?

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पावसात शूट करणं धोकादायक
यावर किरण म्हणतात, मी काळजीत होते. की, बाहेर पाऊस पडत आहे आणि सिकंदर शूटिंगसाठी गेला होता. त्यांना भीती वाटत होती की जर तो इतक्या पावसात घसरला किंवा आणखी काही घडलं तर. त्यांच्या या काळजीबद्दल, चाहते त्यांना सलाम करू लागले आणि आई-मुलाच्या बंधनाचं कौतुक करू लागले.