फॅनने फोटोच्या निमित्तानं केलं अभिनेत्रीला Kiss; धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद

अभिनेत्री जस्मिन भसीनचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated: Aug 13, 2021, 04:34 PM IST
 फॅनने फोटोच्या निमित्तानं केलं अभिनेत्रीला Kiss; धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद  title=

मुंबई : जस्मिन भसीन बिग बॉसमधून आल्यापासून तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ लगेचच सोशल मीडियावर व्हायरल होतात. अलीकडेच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात ती तिच्या चाहत्यासोबत दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तिचे गुपचुप फोटो काढले जात आहे पण नंतर तिला असं काही घडलं की ती स्तब्ध झाली.

फॅनने जस्मिनला केलं किस 
अभिनेत्री जस्मिन भसीनच्या सोशल मीडियावर अनेक चर्चा आहेत. तिने तिच्या अनोख्या स्टाईलने चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. जिथे चाहते त्यांना पाहतात, ते त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी हतबल होतात. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात एका चाहत्याने अचानक जस्मिन भसीनला किस केलं. ज्यावर जास्मिनची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. जस्मिन भसीनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

स्तब्ध झाली जास्मिन
जस्मिन भसीनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं की, जस्मिन भसीनला हॉस्पिटलच्या बाहेर मीडिया रिपोर्टरने पाहिलं आहे. जिथे तिचा एक चाहता तिच्याकडे सेल्फी घेण्यासाठी येतो आणि अचानक जास्मिनला किस करतो. ज्यावर जास्मिन स्तब्ध होते. जास्मिनचा हा व्हिडिओ पाहून तिचे चाहते अनेक मजेदार कमेंट्स करत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जास्मिनचं काम
जस्मिन भसीन तिच्या प्रोफेशनल आयुष्यापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. ती अभिनेता अली गोनीला डेट करत आहे. दोघांचं प्रेम बिग बॉसच्या घरातच फुललं. जास्मिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिने 'दिल से दिल तक', 'बेलन वाली बहू', 'नागिन' आणि 'तू आशिकी' सारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.