सिद्धार्थ नव्हे, तर या व्यक्तीमुळे Shehnaaz Gill स्वत:ला संपवायला निघाली? आणि...

भांडण केल्यानंतर जीव देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर 

Updated: Jan 28, 2022, 04:28 PM IST
 सिद्धार्थ नव्हे, तर या व्यक्तीमुळे Shehnaaz Gill स्वत:ला संपवायला निघाली? आणि... title=

मुंबई : पंजाबची कतरिना कैफ म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री शेहनाज गिलने नुकताच वाढदिवस साजरा केला आहे. आता शहनाज गिल 29 वर्षांची झाली आहे.शेहनाज गिल ही त्या टीव्ही सुंदरींपैकी एक आहे. जिचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. शेहनाज गिलच्या क्यूट अंदाजावर लोक फिदा आहेत. पण असे बरेच लोक आहेत ज्यांना 

शेहनाज गिल विशेष काही आवडत नाही. या स्टार्सनी अनेकवेळा शेहनाजचा अपमान केला आहे. तर शेहनाज गिललाही या लोकांपासून दूर राहणे आवडते. या शत्रूंमध्ये एक नाव आहे. ज्या व्यक्तीमुळे शेहनाज गिलने जीव देण्याचा प्रयत्न केला.

शेफाली जरीवाला

शेफाली जरीवाला (Shefali Jariwala)

शेफाली जरीवालाने सिद्धार्थ शुक्लाला डेट केले आहे. याच कारणामुळे शेहनाज गिल फली जरीवालाचा तिरस्कार करू लागली. शेफाली जरीवालाने बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच शेहनाज गिलने सिद्धार्थ शुक्लासोबत भांडण सुरू केले. शेफाली जरीवाला आणि शेहनाज गिल अनेकदा घरात गोंधळ घालताना दिसल्या आहेत.

देवोलिना भट्टाचार्जी

देवोलीना भट्टचार्जी (Devoleena Bhattacharjee)

बिग बॉस 13 च्या घरात देवोलिना भट्टाचार्जी आणि शेहनाज गिल यांच्यात अनेकदा भांडण झाले आहे. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरही त्यांच्यातील वैर संपले नाही. सिद्धार्थ आणि शेहनाज गिलचा 'भुला देगा' म्युझिक व्हिडिओ पाहिल्यानंतर देवोलिना भट्टाचार्जीने टोमणे मारण्यास सुरुवात केली. या व्हिडिओमध्ये शेहनाज गिलऐवजी रश्मी देसाई असायला हवी होती, असे देवोलिना भट्टाचार्जीने म्हटले होते. देवोलिना भट्टाचार्जी यांच्या या कमेंटने खळबळ उडाली.

रश्मी देसाई

सिद्धार्थ शुक्लामुळे शेहनाज गिलही रश्मी देसाईची शत्रू बनली होती. बिग बॉस 13 च्या घरात रश्मी देसाईने शेहनाज गिलचा अपमान करण्याचा प्रयत्न केला. या दोन सुंदरी बिग बॉसच्या घरात अनेकदा भांडताना दिसल्या आहेत.

हिमांशी खुराना

हिमांशी खुराना (Himanshi Khurana)

हिमांशी खुराना आणि शेहनाज गिल यांच्यात छत्तीसचा आकडा राहिला आहे. बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी पासूनच हिमांशी खुराना आणि शेहनाज गिलचे वैर सुरू आहे. शेहनाज गिलनेही हिमांशी खुराणासोबत भांडण केल्यानंतर जीव देण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते.याची खूप चर्चा झाली होती. हिमांशी खुराणा बिग बॉसमध्ये प्रवेश करताच शेहनाज गिलची प्रकृती बिघडली. शहनाज गिलने बिग बॉसचे घर डोक्यावर घेतले.

Disclaimer :  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमान करत नाही.