Alia Bhatt च्या 'या' गोष्टीची सिद्धार्थ मल्होत्राला येतेय आठवण, ब्रेकअपनतंर म्हणाला...

सिद्धार्थ मल्होत्राला सतावतेय एक्स गर्लफ्रेंडची आठवण, ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर झाला व्यक्त  

Updated: Aug 20, 2022, 09:51 AM IST
Alia Bhatt च्या 'या' गोष्टीची सिद्धार्थ मल्होत्राला येतेय आठवण, ब्रेकअपनतंर म्हणाला...  title=

मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केलं, पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. दोघांचे मार्ग आता कायमचे वेगळे झाले असले तरी, सिद्धार्थला मात्र एक्स गर्लफ्रेंड आलियाची आठवण आजही सतावत आहे. नुकताच दिग्दर्शक करण जोहकच्या कॉफी विथ करण 7 शोमध्ये सिद्धार्थने मोठा खुलासा केला. करण जोहरने सिद्धार्थ मल्होत्राला विचारलं की अभिनेत्याला एक्स गर्लफ्रेंडबद्दल काय आठवतं. 

यावर सिद्धार्थ म्हणाला, 'तिची मांजर...',  ब्रेकअप झाल्यानंतर सिद्धार्थच्या आठवणीत आलिया आजही आहे. महत्त्वाचं म्हणजे सिद्धार्थने आलियाचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे. आलियाला मांजर फार आवडतात. 

यासोबतच सिद्धार्थ मल्होत्रा सध्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री किआरा आडवाणीबद्दल देखील बोलला. अभिनेत्रीसोबतच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दलही त्याने सांगितले. 'किआराला डेट करत आहेस...' असा प्रश्न  करणने सिद्धार्थला विचारलं. 

याप्रश्नाचं उत्तर देणं अभिनेत्याने टाळलं. पुढे करण म्हणाला, 'किआराला डेट करत आहेस, भविष्याबद्दल काही प्लानिंग आहेत?' यावर सिद्धार्थ म्हणाला, 'भविष्य उज्वल आहे.'

भविष्य उज्वल आहे.. असं सिद्धार्थ म्हणाल्यानंतर करणने विचारलं 'कियारा सोबत...' यावर देखील सिद्धार्थने लक्षवेधी उत्तर दिलं आहे. 'किआरा असेल तर, ग्रेट होईल....' सध्या अभिनेत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.