सततच्या अपयशाने कंटाळून केली ज्यूस विकायला सुरुवात, मृत्यूनंतर मुलांसाठी ठेवली कोट्यवधींची माया

या सेलिब्रिटीच्या लेकीनंच केला खुलासा...

Updated: Aug 20, 2022, 09:41 AM IST
सततच्या अपयशाने कंटाळून केली ज्यूस विकायला सुरुवात, मृत्यूनंतर मुलांसाठी ठेवली कोट्यवधींची माया title=

मुंबई : आजकाल आपण पाहतो की असे बरेच लोक आहेत ज्यांना करिअरमध्ये यश मिळत नाही. त्यामुळे कोणी सॅन्डविचचं दुकान लावतं तर कोणी चहाचा स्टॉल आणि स्वत: चं पोट भरण्याचं काम करते. यात अनेक सेलिब्रिटींची नावं आहेत, ज्यांनी अपयशाला कंटाळून चहाच्या स्टॉलवर, वडापाव विकत तर कधी ज्युस विकला आणि नंतर ते सेलिब्रिटी अचानक यशस्वी झाले. यापैकी एक म्हणजे गुलशन कुमार ( Gulshan Kumar ) आहेत. गुलशन कुमार ( Gulshan Kumar ) हे लोकप्रिय संगीतकारांपैकी एक आहेत. आता गुलशन यांची लेक खुशाली कुमार ( Khushali Kumar) बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. खुशालीचा पहिला चित्रपट 'धोखा - राऊंड डी कॉर्नर' (Dhoka Round D Corner) आहे. या चित्रपटात खुशाली अभिनेता आर माधवनसोबत (R. Madhavan) दिसत आहे. अलीकडेच चित्रपटाचा टीझर लॉन्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खुशालीनं तिच्या वडिलांच्या संघर्षाच्या दिवसांचा एक हृदयस्पर्शी किस्सा सांगितला. 

आणखी वाचा : मराठमोळ्या आजींपुढे अमिताभ बच्चन नतमस्तक, ते भारावलेले क्षण तुम्ही ही पाहाच!

खुशालीनं स्वतःसाठी अभिनय क्षेत्रात करिअर करायचा निर्णय का घेतला? यावेळी वडील गुलशन कुमार यांचा एक सांगत खुशाली म्हणाली,'माझे वडील अभिनेता होण्यासाठी मुंबईत आले, पण तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती आणि पैसे आणि इतर सुविधांअभावी ते त्यांची इच्छा पूर्ण करू शकले नाहीत आणि ते दिल्लीला परतले.' 

आणखी वाचा : ... आणि अबू सालेम जाळ्यात फसला; DGP रुपिन शर्मांनीच सांगितला 'त्या' प्रसंगाचा थरार

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे खुशाली म्हणाली, 'हे खरं माझ्या वडिलांचं स्वप्न आहे कारण त्यांनी अशा नवीन टॅलेंटसाठी एक कंपनी सुरु करण्याचा करण्याची कल्पना केली आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मी स्वत: ला  खूप भाग्यवान समजते.'

आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल

एक काळ असा होता की गुलशन कुमार वडिलांसोबत दिल्लीच्या दर्यागंज मार्केटमध्ये ज्यूसचं दुकान चालवत होते. मात्र, लहानपणापासूनच काहीतरी वेगळं करायचं त्यांचं स्वप्न होतं. त्यांना संगीताचा छंद होता आणि त्यामुळेच त्यांनी ज्यूसचा व्यवसाय सोडून दिल्लीत कॅसेट विकायला सुरुवात केली.

यानंतर स्वत:च्या आवाजात गाणी रेकॉर्ड करत कमी किमतीत विकायला सुरुवात केली. काम चांगलं सुरु होतं आणि मग त्यांनी सुपर कॅसेट इंडस्ट्री नावाने स्वतःचे ऑडिओ कॅसेट ऑपरेशन सुरु केले आणि नंतर नोएडामध्ये स्वतःची निर्मिती कंपनी उघडली आणि नंतर ते मुंबईला शिफ्ट झाले.'

आणखी वाचा : 'रणवीरनं दाखवलं, तुझं काय...?', अर्जुन कपूरच्या बॉयकॉट वक्तव्यावर Bollywood अभिनेत्रीचं Bold वक्तव्य

'धोखा' चित्रपटात खुशाली आणि आर. माधवनशिवाय अपारशक्ति खुराना (Aparshakti Khurana)  आणि दर्शन कुमारही (Darshan Kumar) आहेत. हा चित्रपट 23 सप्टेंबर 2022 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.