Shrimaan Shrimati fame Rakesh Bedi cyber fraud : 90 च्या दशकातील छोट्या पडद्यावरील गाजलेली मालिका म्हणजे मालिका म्हणजे 'श्रीमान-श्रीमती'. या मालिकेतील अभिनेता राकेश बेदी यांच्यासोबत फसवणुक झाली आहे. त्यांना तब्बल 85 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. राकेश बेदी यांनी या प्रकरणाची तक्रारी पोलिसांकडे केली असून गुन्हा दाखल केला आहे. एका मुलाखतीत राकेश बेदी यांनी या गोष्टीचा खुलासा केला. त्याशिवाय त्या व्यक्तीनं त्यांची कशी फसवणूक केली याविषयी सांगितले.
राकेश बेदी यांनी 'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत हा सगळा प्रकार सांगितला आहे. यावेळी ते म्हणाले की त्यांनी ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पुढे सांगितलं की ते खूप मोठ नुकसान होण्यापासून वाचले आहेत. आता त्यांची इच्छा आहे की ते अशी फसवणूक करणाऱ्या लोकांच्या जाळ्यात इतर कोणी अडकू नये.
या कॉलविषयी सविस्तर सांगत राकेश बेदी म्हणाले की, त्यांना एक कॉल आला होता. त्यानं स्वत: ला आर्मी ऑफिसर असल्याचे म्हटले. त्यानं म्हटलं की त्याला पुण्याच्या फ्लॅट घेण्याची इच्छा आहे. मात्र, जो पर्यंत राकेश यांना या गोष्टीची कल्पना येईल की ही फसवणूक आहे. तो पर्यंत त्या व्यक्तीनं त्यांच्या बॅंक अकाऊंटमधून 85 हजार रुपये ट्रान्सफर केले होते.
राकेश बेदी यांनी पुढे सांगितलं की हे सगळं काम लोकं मोठ्या प्रमाणात रात्री करतात. त्यात जर कोणी फसवणूकीच्या जाळ्यात कोणी अडकला तर ते तक्रार करू शकणार नाही. त्यातही तक्रार करण्यासाठी जेव्हा ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस स्टेशनला पोहोचते तो पर्यंत फार उशिर झालेला असतो. तर राकेश बेदी यांनी पोलिसांना या संबंधातील सगळ्या डिटेल्स दिल्या आहेत. त्या व्यक्तीचा बॅंक अकाऊंट नंबर देखील शेअर केला आहे. पोलिसांनी त्यांना सांगितलं की असे काही प्रकार हे गेल्या अनेक काळापासून होत आहेत. तर सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे त्यांच्या अकाऊंटमधून जास्त पैसे गेले नाहीत.
हेही वाचा : जान्हवी कपूरच्या स्पीड डायलवर आहे तरी कोण? खुशीसमोर खुलासा करताच लाजली अभिनेत्री
'श्रीमान-श्रीमती' या मालिकेविषयी सांगायचं झालं तर जतिन कनाकिया, राकेश बेदी, रीमा लागू आणि अर्चना पूरण सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 1994-97 या काळात ही मालिका दुरदर्शनवर प्रदर्शित झाली होती.