'रणदीप तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती'; Instagram वरील त्या 2 Bold फोटोंमुळे चाहते नाराज

Randeep Hooda Lin Laishram Trolled: नोव्हेंबर महिन्यामध्ये हे दोघेही मैतेई सामाजातील प्रथेप्रमाणे दोघं लग्नबंधनात अडकले. या लग्न सोहळ्याचे फोटो पाहून अनेकांनी दोघांचं कौतुक केलं.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 2, 2024, 09:07 AM IST
'रणदीप तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती'; Instagram वरील त्या 2 Bold फोटोंमुळे चाहते नाराज title=
रणदीपने सोशल मीडियावर शेअर केले फोटो

Randeep Hooda Lin Laishram Trolled For Instagram Post: बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा काही आठवड्यांपूर्वीच लिन लैशरामबरोबर लग्नबंधनात अडकला. या दोघांनी ईशान्य भारतामधील पारंपारिक पद्धतीने केलेल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. दोघांनी पारंपारिक पद्धतीचा सन्मान राखत केलेल्या अनोख्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. लग्नानंतर ते मुंबईत परतले तेव्हा त्यांच्या एअरपोर्ट लूकपासून ते मुंबईतील काही ठिकाणी दिसून आल्यासंदर्भातील अनेक बातम्या या दोघांच्या लग्नानंतरपासून समोर आलं. खरं तर हे दोघे लग्नानंतर सातत्याने चर्चेत आहेत. मात्र नवीन वर्षाचं स्वागत करताना रणदीपने पत्नी लिन लैशरामबरोबर शेअर केलेल्या फोटोंवरुन त्याला ट्रोल केलं जात आहे. जेवढं त्याचं कौतुक करण्यात आलं तेवढं ट्रोलिंग आता केलं जात आहे.

काय आहे या फोटोंमध्ये?

31 डिसेंबर रोजी रणदीपने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन पत्नीबरोबरचे 2 फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये रणदीप शर्टलेस असून त्याच्या पत्नीने बीचवेअर परिधान केलं आहे. फोटोला कॅप्शन देताना रणदीपने 2023 चा शेवटचा सूर्यास्त, असं म्हटलं आहे. हा फोटो केरळमधील कुन्नूर येथील असल्याचंही रणदीपने सोशल मिडीया पोस्टमध्ये वापरलेल्या हॅशटॅगवरुन स्पष्ट होत आहे. अन्य एका फोटोमध्ये दे दोघे सेल्फी घेतानाचा फोटो कोणीतरी क्लिक केला आहे. दोघांच्या मागे अथांग समुद्र आणि आकाशात मावळणारा सूर्य असं दृष्य दिसत आहे. 

लाखोंच्या संख्येनं लाइक्स

हे फोटो पाहून रणदीपच्या चाहत्यांचं त्याचं आणि त्याची पत्नी लिन लैशरामचं कौतुक केलं आहे. अगदी अभिनेत्री निना गुप्ता यांनीही फोटो फार छान असल्याची कमेंट केली आहे. बऱ्याच चाहत्यांनी तुम्ही दोघेही फार सुंदर दिसताय असं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी इतर अनेकांनी दोघांना ट्रोल केलं आहे. रणदीपकडून अशा फोटोंची अपेक्षा नव्हती, असं म्हटलं आहे. उगाच बोल्ड फोटो पोस्ट करुन लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असल्याचंही काहींनी म्हटलं आहे. या फोटोला 5 लाख 21 हजारांहून अधिक लाईक्स आहेत. 

लग्नामुळे चर्चेत

रणदीप आणि लिन लैशराम या दोघांचं 29 नोव्हेंबर 2023 रोजी मणिपूरची राजधानी इंम्फाळमध्ये लग्न झालं. मैतेई सामाजातील प्रथेप्रमाणे दोघं लग्नबंधनात अडकले. प्रसिद्ध अभिनेता असूनही इतक्या अनोख्या पद्धतीने आणि पारंपरा जपत रणदीपने लग्न केल्याबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. या दोघांनी नंतर विशेष रिसेप्शनही आयोजित केलं होतं.

लवकरचं दिसणार चित्रपटांमध्ये

लिन लैशराम लवकरच बन टिक्की चित्रपटामध्ये झळकणार आहे. तर रणदीप हुड्डा सध्या वेगवेगळ्या चित्रपटांच्या स्क्रीप्टवर काम करत आहे.