श्रेयस तळपदेच्या मुलीची पहिली झलक !

काही दिवसांपूर्वी अभिनेता श्रेयस तळपदे आणि दीप्ती यांच्या आयुष्यात एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. 

Updated: Jun 28, 2018, 12:33 PM IST
श्रेयस तळपदेच्या मुलीची पहिली झलक ! title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता श्रेयस तळपदे आणि दीप्ती यांच्या आयुष्यात एका चिमुकलीचे आगमन झाले आहे. 13 वर्षांपूर्वी विवाह बंधनात अडकलेल्या श्रेयस आणि दीप्तीच्या आयुष्यात सरोगसीच्या माध्यमातून एका चिमुकलीचे आगमन झालं आहे.  

श्रेयसने शेअर केली पहिली झलक  

श्रेयस तळपदेने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर मुलीसोबतचा खास फोटो शेअर केला आहे. श्रेयस त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी आठवडाभर घरापासून काही वेळ दूर जाणार आहे. अशा आशयाचा मेसेज लिहताना तुला भेटण्यासाठी लवकर परत येईल असा मेसेज मुलीसाठी लिहला आहे. 

 

Cannot wait to get back to you my love. See you next week. Time for Daddy to get back to work.

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27) on

सरोगसीच्या माध्यमातून मुलीचा जन्म  

श्रेयस आणि दीप्ती  मे महिन्याच्या अखेरीस बॅकॉंगला फिरायला निघाले होते. विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांच्या मुलीला सरोगसीच्या मदतीने जन्म देणार्‍या मातेला लवकर प्रसुतीकळा सुरू झाल्या. त्यामुळे हॉलिडे प्लॅन रद्द करून ते परतले. दीप्ती आणि श्रेयसप्रमाणेच बॉलिवूडमध्ये सनी लिऑन, तुषार कपूर, करण जोहर, आमिर खान, शाहरूख खान या सेलिब्रिटींच्या आयुष्यातही सरोगसीच्या माध्यमातून बाळाचे आगमन झाले आहे.