श्रीदेवी आणि बोनी कपूर असे जवळ येत गेले.....

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची प्रेम कहाणी बोनी कपूर यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितली होती. बोनी कपूर म्हणतात, 'जेव्हा मी श्रीदेवीला पहिल्यांदा पडद्यावर पाहिलं होतं, तेव्हापासून मी तिच्या प्रेमात होतो'.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 25, 2018, 01:32 PM IST
श्रीदेवी आणि बोनी कपूर असे जवळ येत गेले..... title=

मुंबई : श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची प्रेम कहाणी बोनी कपूर यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात सांगितली होती. बोनी कपूर म्हणतात, 'जेव्हा मी श्रीदेवीला पहिल्यांदा पडद्यावर पाहिलं होतं, तेव्हापासून मी तिच्या प्रेमात होतो'.

'तेव्हापासून मी तिच्या प्रेमात होतो'

'मी ७० च्या दशकात एक तमिळ चित्रपटात तिला पाहिलं होतं, तेव्हा मी तिला चित्रपटासाठी साईन करण्यासाठी चेन्नईला गेले होतो, पण ती चेन्नईत नव्हती, यानंतर सोलवा सावन पाहिला, तेव्हा आणखी प्रभावित झालो आणि मिस्टर इंडियासाठी तिला साईन केलं'.

'तेव्हा श्रीदेवीची आई सर्व निर्णय घेत होती'

'तेव्हा श्रीदेवीची आई सर्व निर्णय घेत होती. श्रीदेवीला साईन करण्यासाठी मी तिच्या आईला भेटलो, तेव्हा ती सर्वात महागडी अभिनेत्री होती.'

'तिच्या आईने मला सांगितलं की १० लाख रूपये फी असेल, तेव्हा मी सांगितलं ११ लाख देऊ'

'कारण मी तिच्या प्रेमात होतो'

'यानंतर तिच्या आईशी चांगली मैत्री झाली आणि सेटवर त्यांच्यासाठी सर्व काही मी तयार ठेवत होतो, चांगला मेकअपरूम, चांगले कपडे, कारण मी तिच्या प्रेमात होतो.'

'तिला भेटण्यासाठी मी स्वित्झलँडला जात होतो'

'चांदनी चित्रपटाचं शुटिंग सुरू असताना तिला भेटण्यासाठी मी स्वित्झलँडला जात होतो, कारण तिला भेटता यावं, या भेटीचा सिलसिला असाच सुरू होता.'

'ती हळू हळू मला समजून घेत होती'

'मी श्रीदेवीला समजावून सांगण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला, ती हळू हळू मला समजून घेत होती, आणि तिला समजलं की मी खरोखर तिच्यावर प्रेम करतो.'