...म्हणून श्रद्धा कपूर थेट सायना नेहवालच्या घरी पोहोचली

'हसीना पारकर' या चित्रपटात दाऊद इब्राहीमच्या बहिणीची भूमिका साकारणारी श्रद्धा कपूर लवकरच सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटातही 'सायना'ची भूमिका साकारणार आहे. 

Updated: Sep 16, 2017, 03:21 PM IST
...म्हणून श्रद्धा कपूर थेट सायना नेहवालच्या घरी पोहोचली  title=

मुंबई : 'हसीना पारकर' या चित्रपटात दाऊद इब्राहीमच्या बहिणीची भूमिका साकारणारी श्रद्धा कपूर लवकरच सायना नेहवालच्या आयुष्यावर आधारित एका चित्रपटातही 'सायना'ची भूमिका साकारणार आहे. 

सायना नेहवालकडून प्रत्येक लहान सहान बारकावे आत्मसात करण्यासाठी सध्या सायना आणि श्रद्धा एकत्र वेळ घालवत आहेत. काही दिवसांपूर्वी श्रद्धाने सायनासोबत बॅटमिंटन कोर्टवर खेळाचे धडेही गिरवले आहेत. आता हैदराबादमध्ये शूटिंग करणारी श्रद्धा थेट सायनाच्या घरी पोहचली.

 

Serious discussion

A post shared by Saina Nehwal (@nehwalsaina) on

 

सायनाच्या घरी श्रद्धाने पूर्ण एक दिवस घालवला. या दरम्यान सायना घरी कशी असते? तिच्या आवडीनिवडी काय आहेत ? याची माहिती करून घेतली. सायनाच्या घरी श्रद्धाला खास दावतही मिळाली. सायनाने काही खास क्षण इंस्टाग्रामवर फोटोच्या स्वरूपात शेअर केले आहेत. 

श्रद्धाने सायनाच्या कुटुंबीयांप्रमाणेच पाळीव कुत्रा चॉप्सी सोबतही काही वेळ घालवला. 

 

Lovely moments .... @shraddhakapoor and chopsy at home today 

A post shared by Saina Nehwal (@nehwalsaina) on

सायनाच्या जीवनावर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करणार आहेत.  सध्या श्रद्धा कपूर  बाहूबली फेम प्रभास सोबत 'साहो' चित्रपटाचे हैदराबादमध्ये चित्रीकरण करत आहे.