मुंबई : बी टाऊनमध्ये अभिनेत्री सोनम कपूर हिच्या विवाहाच्या चर्चा जोरात आहेत. सोनमच्या पाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरही लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज झालीय... नक्कीच हे समजल्यानंतर अनेक तरुणांच्या हृदयाची धडधड थांबली काही काळासाठी थांबली असेल... पण, श्रद्धानंही आता आपल्या खाजगी आयुष्यावर फोकस करायचं ठरवलंय... श्रद्धा कुणासोबत विवाह करतेय, हे समजल्यानंतर कदाचित तुम्हालाही सौम्य धक्का बसू शकेल.
श्रद्धा लवकरच तिचा बॉयफ्रेंड अभिनेता फरहान अख्तर याच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, फरहान अख्तर याचा हा दुसरा विवाह असेल. फरहाननं त्याची पूर्व पत्नी अधुना हिच्यासोबत घटस्फोट घेतलाय. फरहान आणि अधुना यांचं २००० साली लग्न झालं होतं आणि २४ एप्रिलला त्यांनी घटस्फोट घेतला होता. इतकंच नव्हे, तर फरहान - अधुनाच्या घटस्फोटासाठी श्रद्धाच कारणीभूत असल्याचंही म्हटलं जात होतं.
'रॉक ऑन - 2' या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान श्रद्धा आणि फरहान या दोघांची ओळख झाली होती. तेव्हापासून हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांनी लवकरच विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतलाय.
फरहान अख्तर आणि श्रद्धा कपूर हे दोघं रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत आहेत. एवढंच काय तर श्रद्धा कपूर वडील शक्ती कपूर यांनी फरहानच्या घरी जाऊन श्रद्धाला आपल्यासोबत घेऊन आले होते, अशाही चर्चा बी टाऊनमध्ये सुरू होत्या. पण, शक्ती कपूर यांनी मात्र या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं होतं.
फरहान हा प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचा मुलगा आहे... तो स्वत:ही छान कविता लिहितो, शायरी करतो... सोबतच तो गायक, दिग्दर्शक, लेखक आणि सिने-निर्माताही आहे.