सैफ विसरला स्वतःच्याच घरचा रस्ता

काय आहे हा प्रकार?   

Updated: Sep 19, 2019, 11:37 AM IST
सैफ विसरला स्वतःच्याच घरचा रस्ता  title=

मुंबई : कुणी स्वतःच्याच घरचा रस्ता कसा विसरू शकतो? पण असं खरंच झालं आहे. सैफ अली खान चक्क पतौडीमधील आपल्या घराचा रस्ता विसरला. तर झालं असं की, सैफ अली खान आपल्या कुटुंबासोबत कतरिनाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहोचला. 

२१ सप्टेंबर रोजी बेबो करिना कपूरचा वाढदिवस आहे. यासाठी सैफ कुटुंबासह पतौडीमध्ये पोहोचला. पण झालं असं की, तेथे गेल्यावर तो आपल्या महालाचा रस्ताच विसरला. आपल्याच घराचा रस्ता विसरल्यामुळे सगळीकडे सैफच्या या चुकीची चर्चा होत आहे. 

एअरपोर्टवरून सैफने एसयूवी टॅक्सी केली आणि तो पुढच्या सीटवर बसला तर मागे करीना बसली होती. जवळपास दुपारी २.३० ची वेळ झाली होती. सैफने गाडी चुकून गाडी बाजारात गेली. थोडं पुढे गेल्यावर त्याला लक्षात आलं की, आपण रस्ता विसरलो आहे. 

तेव्हा सैफने रस्त्यावर चालणाऱ्या विद्यार्थ्यांनाच आपल्या घरचा रस्ता विचारला. सैफला रस्ता विचारताना बघून विद्यार्थीपण सुरूवातीला थोडे गोंधळले. पण पहिले सेल्फी काढून विद्यार्थ्यांनी त्याच्याच घरचा रस्ता त्याला सांगितला. 

सैफ अली खान आपल्या इब्राहिम पॅलेसमध्ये पत्नी करीना कपूरचा वाढदिवस साजरा करणार आहे. येत्या २१ सप्टेंबर रोजी करीना ३९ वर्षांची होणार आहे. यानिमित्ताने इब्राहिम पॅलेसमध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित राहणार आहे. याकरता पतौडी महालात खास व्यवस्था देखील करण्यात आली आहे.