धक्कादायक : ओव्हर एक्टिंगमुळेच करीनाचं करिअर संपलं? 'या' कमेंटने एकच खळबळ

 बॉलिवडूची बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर खानच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींच्या प्रेरणास्थानी करिना विराजमान आहे.मात्र आता एका व्हिडीओमुळे ती खूप ट्रोल होत आहे.

Updated: Sep 1, 2023, 04:56 PM IST
धक्कादायक : ओव्हर एक्टिंगमुळेच करीनाचं करिअर संपलं? 'या' कमेंटने एकच खळबळ title=

मुंबई : बॉलिवडूची बेबो अर्थात अभिनेत्री करिना कपूर खानच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींच्या प्रेरणास्थानी करिना विराजमान आहे. तिच्या फॅशन सेन्सकडे चाहत्यांच्या नजरा असतात. अभिनेत्री करिना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान यांची जोडी बॉलिवूडमधील काही आघाडीच्या जोड्यांपैकी एक. करिना आणि सैफच्या नात्याचा कायमच सर्वांना हेवा वाटला.  करिनाचं सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. करीनाचे अनेकदा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

विरल बयानी या इन्स्टाग्राम पेजवरुन एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये करिना मॉलमध्ये एका गाडीत बसल्याचं दिसत आहे. यावेळी ती पापाराझींकडे पाहून हात दाखवते आणि स्माईल देते. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी करीनाच्या या व्हिडीओवर कमेंटस्चा वर्षाव केला आहे. एका युजर्सने कमेंट करत लिहीलंय की, ओव्हर एक्टिंगमुळेच करीनाचं करिअर संपलं. तर अजून एकाने लिहीलंय, स्वतःच्या पापांची माहिती पाठवून, वृत्ती स्वतःच दिसेल.

तर अजून एका युजर्सने म्हटलंय, तिला भारताबाहेर पाठवलं जात असल्याचं दिसतंय. तर अजून एकाने लिहीलंय, झाडू आणि पोछा द्या हिच्याकडे बाकी तर कपडे पण सेम आहेत. तर अजून एकाने लिहीलंय, ऑटोमध्ये फिरतेय. तर अनेकांनी तिच्या लूकचं कौतुकही केलं आहे. एका युजर्सने कौतुक करत लिहीलंय,  ती खूपच सुंदर आहे. जे काजळ करीनाच्या डोळ्यात छान वाटतं. ते अजून कोणाच्याच डोळ्यात छान नाही वाटत. तर अजून एकाने लिहीलंय, किती सुंदर आहेस तु. कसं जपतेस तुझं सौंदर्य.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अभिनेत्री करीना कपूरला बॉलिवडूची बेबो म्हणून ओळखलं जातं. करीनाचं लग्न अभिनेता सैफ अली खानसोबत झालं आहे. सैफ करिनाची बी टाऊनमधील प्रसिद्ध जोड्यापैकी एक आहे. करीना आणि सैफ कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. करीनाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. करीनाच्या पर्सनल आयुष्यात काय चाललं आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. तैमुर आणि जहांगिर अशी दोन मुलं अभिनेत्रीला आहेत. हे स्टारकिड सुद्धा कायम मीडियामध्ये चर्चेचा विषय असतात.