Kiara Advani on Koffee With Karan 7 : कियारा अडवाणीने (Kiara Advani) तिच्या दमदार अभिनयाने कमी वेळातच बॉलिवूड चित्रपटसृष्टीत चांगले स्थान मिळवले आहे. सध्या तिची गणना बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींमध्ये केली जात आहे. तिनं तिच्या अभिनयाने बॉलिवूडचेच नाही तर चाहत्यांची ही मनं जिंकण्यात यशस्वी झाली आहे. तिचे सगळेच चित्रपट बहुतांशी सुपरहिट ठरले आहे. 2014 साली कियारा अडवाणीने फुगली (Fugly) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती भूल भुलैया 2, कबीर सिंग, शेरशाह, जुग जुग जिओ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली आहे. तिने बॉलिवूडमध्ये येताच अनेक अभिनेत्रींना अभिनायाच्या जोरावर मागे टाकत अव्वल क्रमांक पटकावला. (shocked first time Kiara Advani sharing bedroom secrets with fans nz)
कॉफी विथ करणमध्ये (Koffee With Karan) हा टिव्ही वरील प्रसिद्ध शो पैकी एक आहे. या शो मध्ये अनेक बडे कलाकार आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा करतात. या शो मध्ये सगळेच बिनधास्तपणे उत्तर देत असतात. अलीकडेच कियारा अडवाणी करण जोहरच्या प्रसिद्ध शो कॉफी विथ करणमध्ये (Koffee With Karan) पोहोचली होती, जिथे तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गुपिते शेअर केली होती. कियारा अडवाणीपूर्वी, रणवीर सिंग-आलिया भट्ट, अक्षय कुमार-समंथा रूथ प्रभू, सारा अली खान-जान्हवी कपूर, विजय देवराकोंडा-अनन्या पांडे आणि विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांसारखे तारे कॉफी विथ करण सीझन 7 मध्ये दिसले आहेत.
करण जोहरच्या या शोच्या 8 व्या एपिसोडमध्ये कियारा अडवाणी तिच्या कबीर सिंग या चित्रपटाचा मुख्य अभिनेता शाहिद कपूरसोबत पोहोचली. यादरम्यान कियारा अडवाणीने सिद्धार्थ मल्होत्रा तिचा खास मित्र असल्याचा खुलासा केला. जेव्हा करण जोहरने शाहिद कपूरला विचारले की तू बेडवर कोणती भूमिका करतोस. याशिवाय त्याने अभिनेत्रीलाही हाच प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना कियारा म्हणते की माझी आई देखील हा एपिसोड पाहणार आहे. यानंतर करण जोहरने अभिनेत्रीला विचारले की, तुझ्या आईला तू अजूनही व्हर्जिन आहेस असे वाटते का? या प्रश्नाचे उत्तर देणे अभिनेत्रीसाठी सोपे नव्हते. ती म्हणाली हो, मला वाटतं.
करणने तिला आणखी प्रश्न केला की, तू सिद्धार्थसोबत रिलेशनशिपमध्ये राहू नये असे म्हणायचे आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना कियाराने हुशारी दाखवली आणि मी नकार देत नाही आणि हो म्हणणार नाही असे सांगितले. ती म्हणाला की मी आणि सिद्धार्थ जवळच्या मित्रांपेक्षा खूप जास्त आहोत. कॉफी विथ करणमध्ये अनेकदा करण जोहर असे काही प्रश्न विचारतो ज्यातून पळ काढणे प्रत्येकालाच जमेल अशातला भाग नाही. काहीजण त्या प्रश्नांची योग्य उत्तरे देतात तर काहींना उत्तरे देताना अडचणी येतात. अनेकदा काही कलाकार त्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे चाहत्यांकडून ट्रोल देखील होतात.