शिल्पा तब्बल ११ वर्षांनंतर झळकणार रूपेरी पडद्यावर

स्वत:च्या अभिनय कौशल्याने तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

Updated: Jul 10, 2019, 07:44 PM IST
शिल्पा तब्बल ११ वर्षांनंतर झळकणार रूपेरी पडद्यावर title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये एककाळ गाजवणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टी पुन्हा रूपेरी पडद्यावर पुन:पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तब्बल ११ वर्षांनंतर ही 'फिट गर्ल' आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ करणार आहे. स्वत:च्या अभिनय कौशल्याने तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. रूपेरी पडद्यापासून दूर असली तरी ती नृत्य परिक्षकाची भूमिका बजावत आहे. त्याचप्रमाणे ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. ती नेहमी इन्स्टाग्रामवर फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते.

मीडिया रिपोर्टनुसार, शिल्पा शेट्टीच्या अनेक चित्रपट निर्मात्यांशी चर्चा सुरू आहे. पण कोणत्याही भूमिकेला साकारण्यासाठी तिने ठराविक वेळ मागीतल्याच्या चर्चा रंगत आहेत. ती २ मोठ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून चाहत्याच्या भेटीस येणार आहे. सध्या या प्रोजेक्ट संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

मात्र शिल्पाकडून कोणत्याही गोष्टीचा खुलासा करण्यात आलेला नाही. सध्या ती पती राज कुंद्रा आणि मुलगा वियानसह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. त्यांच्या या सुट्ट्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील काही व्हिडिओ शेअर केले आहेत.