मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा ही जोडी अत्यंत परफेक्ट असल्याचं वेळोवेळी सांगितलं जातं. शिल्पा राज कुंद्रा यांची दुसरी पत्नी आहे. अशात गेल्या काही दिवसांपासून राज आणि त्यांची पूर्व पत्नी कवीता यांच्यामधील वाद चव्हाट्यावर आला आहे. राज कुंद्राने पहिल्यांदा त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल खळबळजनक खुलासा केला आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत राज यांच्या पहिल्या पत्नीने शिल्पावर आरोप केले होते. त्यानंतर राज यांनी मौन सोडलं आहे.
एका मुलाखतीत राज कुंद्रा यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला. कुंद्रा म्हणाले, 'मी यावर अनेक वर्षांपासून गप्प आहे. पण आता सगळ्या गोष्टी सांगत असल्यामुळे समाधन वाटत आहे. कारण मी आता सत्य सांगत आहे. माझ्या आईने कविता आणि माझ्या बहिणीचा पती वंश यांना अनेकदा नको त्या अवस्थेत पाहिलं. त्यांच्यामुळे दोन कुटुंब तुटत होते. त्यांनी कसलाचं विचार केला नाही. '
पुढे कुंद्रा म्हणाले, 'घटस्फोट झाल्यानंतर मी कधीचं कवितासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणारही नाही. मी माझ्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न केला. पण कविता आणि तिच्या कुटुंबाने मला माझ्या मुलीला भेटू दिलं नाही. मी फक्त 40 दिवस माझ्या मुलीला पाहिलं आहे. तेव्हा कोर्टाने देखील कविताच्या बाजूने निकाल दिला.'
'मी जेव्हा व्हायरल होत असलेले आर्टिकल पाहिले तेव्हा ते मी शिल्पला पाठवले. शिल्पाने मला यावर काहीही न बोलण्यास सांगितलं. मुख्य म्हणजे शिल्पच्या वाढदिवसाच्या दिवशी आर्टिकल व्हायरल झाले, त्यामुळे मला धक्का बसला. कविताने फक्त मला फसवलं नाही, तर तिच्यामुळे 2 कुटुंब तुटले आहेत. माझ्या वक्तव्यामुळे शिल्पा नाराज आहे. पण खरं काधीतरी समोर येणार होतं ' असं राज कुंद्रा म्हणाले.