राज कुंद्राच्या सुटकेनंतर करवा चौथ साठी shilpa shetty ची मोठी तयारी?

 राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात बराच काळ जेलमध्ये होता.

Updated: Oct 21, 2021, 12:05 PM IST
राज कुंद्राच्या सुटकेनंतर करवा चौथ साठी shilpa shetty ची मोठी तयारी? title=

मुंबई : राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात बराच काळ जेलमध्ये होता. यावेळी राज कुंद्रावर अनेक आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. शिल्पा शेट्टीला ही अनेक आरोपांचा सामना करावा लागला. 

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची जोडी बॉलिवूडमधील फेवरेट कपल पैकी एक आहे. पण जेव्हा राज कुंद्राच्या अटकेच्या बातम्या समोर येऊ लागल्या तेव्हा शिल्पा पतीला घटस्फोट देणार अशा ही बातम्या येऊ लागल्या होत्या. पण शिल्पा आणि राज यांचं नात अतूट आहे. 

राज कुंद्रा जेलमध्ये असताना काही काळ शिल्पाने कामातून ब्रेक घेतला होता. पण नंतर ती पुन्हा कामावर परतली. एवढंच नाही, तर शिल्पाने राज कुंद्राची सुखरुप सुटका व्हावी यासाठी देवीच्या मंदिरात जाणून अनोख व्रत देखील केलं होतं. 

शिल्पाने जमेल ते प्रयत्न यावेळी केली. आता पती पत्नीच्या नात्याचा उत्सव म्हणजेच करवा चौथ साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी बॉलिवूडमधील अभिनेत्री एकत्र येत करवा चौथ सेलिब्रेट करतात. त्यात शिल्पा शेट्टी नेहमीच आपल्या लूकने आणि उत्साह पुर्ण अंदाजाने सगळ्याचं लक्षवेधून घेत असते. यंदा 24 ऑक्टोबर 2021 ला करवा चौथ साजरा करण्यात येणार आहे. 

शिल्पा दरवर्षी न चुकता पतीसोबत करवा चौथ सेलिब्रेट करते. यंदा अनेक संकंट पार करत राज कुंद्रा घरी परतला आहे. त्यामुळे शिल्पा यंदाचा करवा चौथ कसा सेलिब्रेट करणार आणि यंदाची तयारी ही वेगळी असणार का याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे.