Shilpa Shetty इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाच तिच्या मुंबईतील घरात काय घडलं पाहिलं का?

Shila Shetty : सध्या शिल्पा शेट्टी ही इटलीत तिच्या कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे. अशात आता तिच्या मुंबईच्या घरात चोरी झाली आहे. असं असतानाही सोशल मीडियावर तिचा मोनोकिनीतील फोटो चांगलाच व्हायरल होत असल्याचे दिसत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 15, 2023, 05:19 PM IST
Shilpa Shetty इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असतानाच तिच्या मुंबईतील घरात काय घडलं पाहिलं का? title=
(Photo Credit : Social Media)

Shila Shetty : बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या इटलीत सुट्टीचा आनंद घेत आहे. इटलीत शिल्पा तिच्या कुटुंबासोबत वेळ व्यथित करत आहे. त्यांच्यासोबत सुट्टीचा आनंद कसा घेते याविषयी सांगण्यासाठी तिनं सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर केले. दरम्यान, शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील जुहू या परिसरात असलेल्या घरात चोरीची घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. PTI नं दिलेल्यावृत्तानुसार ही घटना आठवडाभरापूर्वीची आहे. 

आज 15 जून २०२३ रोजी पोलिसांनी एजन्सीला सांगितले की, गेल्या आठवड्यात जुहू पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिल्पाच्या घरी घरफोडी झाल्याची आणि या घरफोडित काही मौल्यवान वस्तू गहाळ झाल्याची तक्रार समोर आली होती. तक्रारीनंतर तत्काळ गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

मात्र, यादरम्यान शिल्पा शेट्टी मुंबईत नसल्याचे समोर आले आहे.  शिल्पा सध्या आपल्या कुटुंबासह इटलीमध्ये सुट्टी घालवत आहे. शिल्पाने तिच्या इन्स्टाग्रामवर या व्हेकेशनचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तिनं शेअर केलेल्या काही फोटोंपैकी चर्चा आहे ती शिल्पाच्या मोनोकिनी ड्रेसची. तिचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. शिल्पाची फिट बॉडी अणि बोल्ड अदा पाहून तिचे चाहते भलतेच थक्क झाले आहेत. 8 जून रोजी शिल्पानं तिचा 48 वा वाढदिवस साजरा केला आहे. या वयात इतकी फीट आणि टोन्ड बॉडी मेन्टेन ठेवण यासाठी शिल्पा किती मेहनत करत असेल असं म्हणत अनेकांनी कमेंट केल्या आहेत. 

हेही वाचा : काजोलची लेक Nysa 'या' बिझनेसमॅनला करते डेट?

दरम्यान, 2021 मध्ये शिल्पा शेट्टीने 14 वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन केले आहे. तिचा 'हंगामा 2' हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म 'Disney Plus Hotstar' वर प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला नाही. त्यानंतर त्यांनी ‘निकम्मा’ चित्रपटातही काम केले, मात्र, हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आपटला. शिल्पा शेट्टी लवकरच ओटीटीवरील रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या सीरिजमध्ये बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ही सीरिज पुढील वर्षी OTT वर प्रदर्शित होऊ शकते. त्यानंतर ती ‘सुखी’ या चित्रपटातही दिसणार आहे.