मी प्रेग्नंट... लग्नानंतरच्या 'त्या' चर्चांवर शिबानीचा पहिल्यांदाच उलगडा

व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे चर्चेला उधान आलं आहे. फोटो पाहून शिबानी प्रेग्नेंट आहे का? असा प्रश्न युजर्स कमेंट करत विचारत आहेत.  

Updated: Mar 3, 2022, 11:33 AM IST
मी प्रेग्नंट... लग्नानंतरच्या 'त्या' चर्चांवर शिबानीचा पहिल्यांदाच उलगडा  title=

मुंबई : अभिनेत्री शिबानी दांडेकर आणि अभिनेता फरहान अख्तरने 19 फ्रेब्रुवारी रोजी लग्न करत नव्या आयुष्याला सुरूवात केली. लग्नानंतर दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. फोटोंमध्ये फरहान आणि शिबानीच्या प्रेमाला उधाण आल्याचं दिसत आहे.  फोटोंच्या चर्चे दरम्यान शिबानी प्रेग्नेंट आहे का? असा प्रश्न सोशल मीडियावर दोघांना विचारला जात होता.

यावर पहिल्यांदाचं  शिबानीने उलगडा केला आहे. शिबानीने इस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये शिबानी प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. फोटोसोबत तिने कॅप्शनच्या माध्यमातून ती प्रेग्नेंट नसल्याची माहिती दिली आहे. 

कॅप्शनमध्ये तिने 'मी स्त्री आहे, मी प्रेग्नेंट नाही...' असं म्हणतं तिने चाहत्यांना प्रेग्नेंट नसल्याची माहिती दिली आहे. दरम्यान दोघांचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये फरहान आणि शिवानी एकमेकांच्या प्रेमात मग्न झाल्याचं दिसून येत आहे.

सध्या सर्वत्र त्यांच्या प्रेमाची चर्चा आहे. त्यांच्या लग्नानंतरचे काही फोटो व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोघे परफेक्ट कपल दिसत आहेत. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.