Sherlyn Chopra On Rakhi Sawant-Adil Khan Durrani: वैवाहिक आयुष्यात वादळ निर्माण झाल्याने राखी सावंत (Rakhi Sawan) सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. आदिल (Adil Khan Durrani) आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप राखीने केला आहे. त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर आदिलला अटक (Adil Khan Durrani Arrest) करण्यात आली आहे. आदिलला 14 दिवसांसाठी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे. अशातच आता या प्रकरणात अभिनेत्री शार्लिन चोप्राची एन्ट्री (Sherlyn Chopra) झाल्याचं पहायला मिळतंय.
राखी सावंतने नुकताच तिचा नवरा आदिल खानबद्दल (Rakhi Sawant allegations on Adil Khan Durrani ) धक्कादायक खुलासा केलाय. आदिल खानने तिचे न्यूड व्हिडिओ (Nude videos) बनवून विकत असल्याचा आरोप तिने केलाय. माझी केस सायबर क्राइम विभागाकडे (cyber crime department) सुरू आहे. त्याला आता तनुशी लग्न करायचे आहे आणि तेही तिसऱ्यांदा, असंही राखीने म्हटलं आहे. त्यानंतर आता शार्लिने या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं.
पोलिस स्टेशनमध्ये आदिलसोबत काही वेळ घालवल्यानंतर मी म्हणू शकते की तो माणूस सरळ मार्गाने चालणारा व्यक्ती आहे. या सगळ्या गोंधळात तो कसा अडकला माहीत नाही, पण मी त्याच्याशी जितका वेळ बोललो तितका वेळ मला वाटलं की तो एक स्थिर माणूस आहे, असं शार्लिन चोप्रा म्हणाली आहे. मी तिच्या पतीला माझा भाऊ मानते आणि त्याच्याबद्दल ऐकून मला बरं वाटत नाही, असंही शार्लिन (Sherlyn Chopra On Adil Khan Durrani) यावेळी म्हणाली आहे.
मी त्याला चेहऱ्यावर सांगितलं की, तू स्थिर दिसतोस, मग तू कसा अडकलास. या संपूर्ण प्रकरणात तो कसा अडकला आणि हेडलाइन्स बनवण्यासाठी हे लोक एकमेकांशी भांडतात किंवा त्यांच्या नात्याची खिल्ली उडवतात हे आवश्यक नाही, असं मत शार्लिने (Sherlyn Chopra) यावेळी मांडलं आहे.
काहीही झालं तरी दोघांमधील हा संघर्ष लवकर संपायला हवा. जर तिचा नवरा खरंच असं काही करत असेल तर त्याने आपली चूक मान्य करायला हवी. जर तुम्ही करत नसाल तर हा गैरसमज कोणामुळे झाला आणि या दोघांबद्दल हा गैरसमज कसा निर्माण झाला ते सांगा, असं स्पष्ट मत शार्लिने मांडलं आहे.
दरम्यान, मी आदिलने मारल्याचं सांगितल्यावर माझी आई (Rakhi Sawant Mother) खूप रडली होती. मला वडील असते तर कदाचित आदिलने ही हिंमत केली नसती, असं राखी म्हणाली आहे. राखी सावंतने आठ महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदिल खानशी लग्न केलं होतं. त्यानंतर आता दोघांच्या आयुष्यात वादळ आल्याचं पहायला मिळतंय.