Kiara Advani गरोदर? तिचं वागणं पाहता पुढील 3- 4 महिन्यांत गोड बातमी देणार असल्याच्या चर्चा

sidharth malhotra kiara advani wedding: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री किआरा अडवाणी यानी नुकतीच लग्नगाठ बांधली. राजस्थानमधील सूर्यगढ येथे पार पडलेल्या या लग्नसोहळ्यानंतर किआरानं सासरच्या घरी पाऊल ठेवलं.   

Updated: Feb 10, 2023, 10:09 AM IST
Kiara Advani गरोदर? तिचं वागणं पाहता पुढील 3- 4 महिन्यांत गोड बातमी देणार असल्याच्या चर्चा  title=
will bollywood newly weds sidhart malhotra kiara advani announce actress pregnancy as she spotted hiding something photo viral

Is Kiara Advani Pregnant: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांचा विवाहसोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. अतिशय दिमाखदार अशा या सोहळ्यामध्ये काही आप्तेष्ठ आणि खास मित्रपरिवाराची हजेरी पाहायला मिळाली. सिड आणि कियारानं आयुष्याची एक नवी सुरुवात केली आणि तिथूनच ते तडक अभिनेत्याच्या दिल्लीतील घरी पोहोचले. जिथं कियाराचं मोठ्या थाटामाटात स्वागत झाली. सूनबाई घरी पहिल्यांदाच येणार म्हटल्यावर सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी हा सोहळा अतिशय रंगतदार केला. (sidharth malhotra kiara advani)

कियारासाठी हे क्षण अतिशय महत्त्वाचे होते. किंबहुना या क्षणांचे तिचे अनेक फोटोही व्हायरल झाले. ज्यामध्ये ती लाल रंगाच्या पेहरावामध्ये दिसली. सिडनंही तसाच कुर्ता घातला होता. इथं या जोडीचे फोटो व्हायरल होत असतानाच तिथे भलत्याच चर्चांना उधाण आलं. त्या चर्चा होत्या, कियाराच्या गरोदरपणाच्या. 

हेसुद्धा पाहा : Prabhas and Kriti Sanon Engagement : तूफान चर्चेनंतर अखेर क्रिती सेननने सोडलं मौन, म्हणाली...

लग्नासाठी मुंबईतून निघताना असो, जैसलमेरला पोहोचल्यावर किंवा तिथून निघताना असो. कियाराची एक कृती सर्वांच्याच नजरा वळवून गेली मुख्य म्हणजे प्रश्न उपस्थित करणारी ठरली. कारण, कियारानं या खेपांना अंगावर शाल घेतलेली आणि नकळतपणे ती पोट लपवत होती. आता ती हे जाणीवपूर्वक करत होती, की अनावधानानं तिच्याकडून हे होत होतं हे मात्र कळू शकलेलं नाही. पण, नेटकऱ्यांनी हीच बाब हेरली आणि त्यावरून कमेंट करत एका नव्या चर्चेला तोंड फोडलं. 

कियाराचा फॅशन सेन्स पोलखोल करतोय? (Kiara Advani outfits)

कियारा गेल्या काही दिवसांपासून अशा कपड्यांना आणि रंगांना प्राधान्य देत आहे ज्यामध्ये वाढलेलं वजन किंवा शरीराचा बहुतांश भाग झाकलेला असेल. बरं त्यावर ती वेळोवेळी शाल किंवा ओढणीही घेताना दिसत आहे. याच कारणास्तव काही सोशल मीजिया युजर्सनी तिच्या फोटोंवर गरोदरपणाकडे खुणावणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. 

'पुढील 3-4 महिन्यांमध्ये हीसुद्धा आलियासारखीच गुडन्यूज देणार.... बघा कशी पोट लपवतेय...', 'ही नक्कीच गरोदर आहे... ' अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी करण्यास सुरुवात केली. तूर्तास कियाराच्या गरोदरपणाबाबत अशी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळं या अफवांनाच फाटे फुटताना दिसत आहेत. बरं, या कारणामुळं का असेना कियारा एका नव्या कारणामुळे चर्चेत आल्याचं दिसत आहे.