Sherlyn Chopra : वादग्रस्त अभिनेत्री शर्लिन चोप्रा सध्या OTT वर प्रदर्शित होणाऱ्या 'पौरशपूर 2' वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये तिने राणी स्नेहलताची भूमिका साकारली आहे. त्यामुळे ती प्रमोशनमध्ये बिझी असून ती अनेक ठिकाणी दिसून येतं आहे. नुकताच एका कार्यक्रमाच्या वेळी हिरव्या साडीवर तिने घातलेल्या ब्लाऊजमध्ये ती ट्रोल झाली आहे. आता नुकताच एका मुलाखतीत तिने एका दिग्दर्शकावर गंभीर आरोप केला आहे.
शर्लिन चोप्रा या मुलाखतीत म्हणाली की, '' मला एका दिग्दर्शकाने विचारलं की तू ब्रेस्ट सर्जरी केली आहे का? त्यावेळी मला खोटं बोलण्याची काही गरज वाटली नाही. मी म्हणाली की, माझ्या फ्लॅट चेस्टमुळे मी कंटाळली होती. म्हणून मी सर्जरी केली. त्यावेळी तो दिग्दर्शक म्हणाला की, मी तुमच्या ब्रेस्टला स्पर्श करु शकतो का? तुमच्या कप आकार काय आहे?
त्या या प्रश्नानाने मला धक्का बसला आणि आश्चर्यही वाटलं, कारण लोक कोणत्याही अभिनेत्रीची कप साइजची माहिती मिळाल्यावरच थिएटरला जाणार आहेत का? यानंतर मी त्यांना विचारलं की, तुमचं लग्न झालं आहे का? कारण जर त्यांचं लग्न झालं असेल तर त्यांना महिलांच्या शारीरिक रचनेबद्दल माहिती असेल. दिग्दर्शक म्हणाला, 'हो, पण मी माझ्या पत्नीशी जास्त बोलत नाही.' हे सगळं सांगत तिने कास्टिंग काऊची शिकार झाल्याचा खुलासा केला.
या मुलाखतीत तिने आयुष्यातील सर्वात कठीण काळाबद्दलही सांगितलं. ''2021 मध्ये तिची एक किडनी निकामी झाली होती. त्यावेळी मला वाटलं की माझी वेळ आली आहे. त्यावेळी एवढ्या कठीण काळातही माझ्या कुटुंबातील कोणीही मला मदत केली नाही, तरी मी हार मानली नाही. प्रत्यारोपणासाठीही कोणाची मदत मिळतं नव्हती. त्यावेळी मला माझ्या आयुष्यातील एक दिवसही वाया घालवायचा नव्हता. मला मोकळेपणाने जगायचं होतं. त्यावेळी या संकटातून बाहेर येण्यासाठी काही लोकांनी मला अंमलीपदार्थांचं सेवन करण्याचाही सल्ला दिली. पण मी त्याकडे वळली नाही.''
मी पैशांसाठी अनेकांसोबत सेक्स केलं आहे, या शर्लिनच्या वक्तव्याबद्दलही मुलाखत विचारण्यात आलं. त्यावेळी ती म्हणाली की, ''तुम्हाला निराश करण्यासाठी माफ करा. पण मी आता पैशांसाठी कोणासोबतही झोपत नाही.'' अभिनेत्रीने सांगितलं की, ''तिने हे विधान तिच्या जुन्या रिलेशनशिपबद्दल म्हटलं होतं. तिचा एक्स बॉयफ्रेंड होता तो मोठ्या राजकीय नेत्याचा मुलगा होता. तो ज्या प्रमाणे माझ्याशी वागायचा असं वाटायचं की, तो तिच्यासोबत फक्त सेक्ससाठी होता. ''