मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडसोबत रोमँन्टिक झाली शर्लिन चोप्रा; व्हिडीओ लीक

 आतापर्यंत फक्त राखी सावंतलाच बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हटलं जात होतं, मात्र आता शर्लिन चोप्राचंही नाव या यादीत सामील झालं आहे. नुकतंच राखी सावंत आणि तिचा एक्स पती आदिल दुर्रानी यांच्या घटस्फोटाची चांगलीच चर्चा रंगली होती.

Updated: Nov 6, 2023, 12:31 PM IST
मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडसोबत रोमँन्टिक झाली शर्लिन चोप्रा; व्हिडीओ लीक title=

मुंबई  : आतापर्यंत फक्त राखी सावंतलाच बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हटलं जात होतं, मात्र आता शर्लिन चोप्राचंही नाव या यादीत सामील झालं आहे. नुकतंच राखी सावंत आणि तिचा एक्स पती आदिल दुर्रानी यांच्या घटस्फोटाची चांगलीच चर्चा रंगली. या काळात राखीला अनेक चढउतार पहावे लागले. राखीच्या जिवलग मैत्रिणी राजश्री आणि शर्लिन चोप्रा देखील आदिलच्या समर्थनार्थ पुढे आल्या. शर्लिन आणि राजश्रीनेही आदिलला भाऊ म्हणत राखी बांधली. मात्र, आता व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ वेगळीच गोष्ट सांगत आहे.

शर्लिन रोजच ट्रोलिंगची शिकार होत असते, मात्र यावेळी तिला एका खास कारणामुळे ट्रोल केलं जात आहे. खरं तर, यावेळी शर्लिन चोप्रा राखी सावंतचा एक्स पती आदिल दुरार्नीसोबत रोमँटिक होताना दिसली आहे. हे पाहिल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स तिच्यावर चांगलेच संतापले आहेत. शर्लिन मधल्या काळात राखीच्या समर्थनात आली होती, पण आता ती पुन्हा आदिलसोबत हँग आउट करताना दिसत आहे. शर्लिन आदिलवरील तिचं प्रेम जाहीरपणे व्यक्त करत आहे.

शर्लिनची ही वृत्ती पाहून चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये लोक शर्लिनचा चांगलाच क्लास घेत आहेत. व्हिडिओवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं आहे की, 'काय करतेय ही याच्यासोबत... कधी भाऊ, कधी बॉयफ्रेंड'. तर दुसर्‍याने लिहिलं आहे, 'भयंकर कलियुग आलं आहे भाऊ'. तर अजून एका यूजरने लिहिलं आहे की, 'पण तिने आदिलला आपला भाऊ बनवलं होतं.' अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राखी सावंत ही अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेत्री शर्लिन चोप्राही राखीच्या तुलनेत काही मागे नाही. राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा अनेकदा भांडताना दिसल्या आहेत. शर्लिनने राखीवर तिचे व्हिडिओ लीक केल्याचा आरोप केला होता. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं पण नंतर राखी आणि शर्लिनची पुन्हा मैत्री झाली. दोघंही अनेक प्रसंगात एकत्र दिसल्या होत्या.आता पुन्हा एकदा राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांच्यात भांडण पाहायला मिळणार आहे. आणि याचं कारण राखीचा एक्स पती आदिल खान असू शकतो.