Shefali Shah on Street Harrasment : अभिनेत्रींना अनेकदा नानाविध गोष्टींना सामोरे जायला लागते परंतु त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगलेली असते. त्यामुळे आता चर्चा आहे ती म्हणजे अशाच एका अभिनेत्रीची. अभिनेत्रींना आणि कलाकारांनाही ट्रोलिंग, हरॅसमेंटलाही सामोरे जावे लागते. सध्या लोकप्रिय अभिनेत्री शेफाली शहा हिनं देखील यावरून भाष्य केले आहे. ओटीटीवरील शेफाली शहा ही फारच लोकप्रिय अभिनेत्री आहे असं म्हणता यईल. कारण तिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या तिनं आपल्या आयुष्यातील एक फारच जीवघेणा प्रसंग सांगितला आहे. त्यामुळे तिनं सांगितेल्या या वक्तव्याची जोरात चर्चा आहे. सध्या याची चर्चा आपल्यालाही विचारात पाडणारी आहे. त्यामुळे नक्की शेफाली काय म्हणाली आहे हे आपण या लेखातून जाणून घेऊया. हल्ली अनेक महिला मग त्या सेलिब्रेटी असो वा कोणी सामान्य महिला.
आपल्यावरती होणाऱ्या अत्याचारांवर आपण बेधडकपणे बोलणं हे फारच महत्त्वाचं आहे. तेव्हा यावेळी या अभिनेत्रीही बेधडकपणे बोलताना दिसत आहेत. यावेळी अशाच एका सामाजिक प्रश्नावर बोलण्यासाठी बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्री या एकाच मंचावर आल्या होत्या. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. काही दिवसांपुर्वी ऐश्वर्या राय बच्चन हिनं आयफेल टॉवरच्या खाली आयोजित केलेल्या एका फॅशन सोहळ्याला उपस्थिती लावली होती. यावेळी हा रंगतदार पॅरिसमधला सोहळा फारच गाजला. यावेळी ऐश्वर्याच्या ड्रेसचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. परंतु सोबतच तिला तिच्या वाढत्या वयावरून ट्रोलही करण्यात आले होते. परंतु यावेळी ऐश्वर्याची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती.
अदिती राव हैदरी, मानसी स्कॉट, शेफाली शहा, मंदिरा बेदी, ऐश्वर्या राय बच्चन यांनी लॉरियल इंडियाच्या स्टॉप स्ट्रीट हरॅसमेंट या सामाजिक मुद्द्यावर आयोजित केलेल्या परिसंवादात भाग घेतला होता. यावेळी अनेकांनी आपल्याला आलेल्या स्ट्रीट हरॅसमेंटबद्दल मत मांडले होते. यावेळी अभिनेत्री शेफाली शहानं जी गोष्ट सांगितली तर खरंच विचारात घेण्यासाठी आहे.
'न्यूज 18'शी बोलताना शेफाली म्हणाली की, ''मी सेलिब्रेटी असेन किंवा नसेन. मला असं नेहमीच वाटतं, अगदी प्रामाणिकपणे की जर का आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले तर आपल्या मुली या अधिक सुरक्षित राहतील. मला दोन मुलं आहेत. माझ्यावरही त्यांना योग्य पद्धतीनं मोठं करण्याची जबाबदारी आहे. आता आजकाल तर आपण आपल्या मुली किती सुरक्षित असायला हव्यात याची पर्वाही करत नाहीत. आपण तर फक्त माणसं कशी सुरक्षित राहतील यावरच बोलतो. माझ्यावर दोन संवेदनशील मुलांची जबाबदारी आहे. मी माझ्या मुलांनाही तेच सांगते की इतरांना आदर करा.''
आपल्यासोबत घडलेल्या एका प्रसंगाचा उल्लेख करताना ती म्हणाली की, ''मीही एकदा अशीच शाळेतून घरी जात होते तेव्हा मला असा अनुभव आला होता. तेव्हा प्रचंड गर्दी होती. त्यामुळे मी काहीच करू शकले नाही सोबतच माझी कोण मदत करायलाही आलं नाही. आजकालच्या महिलांनाही याला सामोरे जावे लागते.''