मुंबई : नुकताच लता मंगेशकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता लता मंगेशकर यांची भाची रचना शाह यांनी ९२ वर्षीय लता मंगेशकर यांच्या चाहत्यांसाठी हेल्थ अपडेट जारी केले आहे.
लतादीदींची प्रकृती आता स्थिर आहे. त्या बरे होत असल्याचे लतादीदींची भाची रचना शाह यांनी सांगितले. सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. त्यांच्या वयामुळे इतरही अनेक समस्या लता दिदींना आहेत. त्यामुळे डॉक्टर त्याची विशेष काळजी घेत आहेत. त्यामुळे ती पुढील काही दिवस रुग्णालयात राहू शकते.
रचना पुढे सांगते की, लता दीदी पूर्णपणे स्थिर आहेत. देव खरोखर दयाळू आहे. कोरोनावर विजय मिळवून ती लवकरच घरी येईल, अशी आशा आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांचे मला आभार मानायचे आहेत. जेव्हा बरेच लोक त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत, तेव्हा त्यांची प्रकृती लवकरच बरी होऊ शकते.
ब्रीच कँडी हॉस्पिटलचे डॉ प्रतीक समदानी यांनीही निवेदन जारी केले. ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, लता दीदींसाठी सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली. तसेच त्यांच्यावर उत्तम उपचार करत आहेत. त्या बऱ्या होत असल्या तरी त्यांच्या कुटुंबीयांना तिला भेटू दिले जाऊ शकत नाही.
लता मंगेशकर यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, BFJA पुरस्कार, सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायिका, फिल्मफेअर विशेष पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांना पद्मभूषण (1969), दादासाहेब फाळके पुरस्कार (1989), महाराष्ट्र भूषण (1997), पद्मविभूषण (1999), भारतरत्न (2001), लीजन ऑफ ऑनर (2007) ने सन्मानित करण्यात आले. 22 नोव्हेंबर 1999 ते 21 नोव्हेंबर 2005 पर्यंत त्या संसदेच्या, राज्यसभेच्या सदस्याही होत्या.