तुझे केस ओढून...; रिअॅलिटी शोमध्ये सलमानची जीभ घसरली, काय हे वागणं?

सूत्रसंचालनादरम्यान सलमानची जीभ अशी घसरली 

Updated: Jan 12, 2022, 11:08 AM IST
तुझे केस ओढून...; रिअॅलिटी शोमध्ये सलमानची जीभ घसरली, काय हे वागणं? title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या चाहत्यांमध्ये अगदी लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे. एकिकडे आपल्या चाहत्यांसाठी इंटिमेट सीन आणि किसिंग सीन न देणारा सलमान कौतुकाची थाप मिळवून जातो. तर हाच सलमान आता इतका चुकीचा वागलाय, की याच शाबासकी देणाऱ्या चाहत्यांनी त्याच्यावर नाराजीचा सूर आळवला आहे. (salman khan)

बिग बॉस या रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालनादरम्यान सलमानची जीभ अशी घसरली की, चाहत्यांनाही धक्का बसला.

तुझे केस पकडून मिड वीकमध्ये काढून घेऊन जाईन...., घरात घुसून तुला मारेन, आई- बहिणीवरुन शिवीगाळ करणं, एखाद्याच्या कामावर प्रश्न उपस्थित करणं, स्पर्धकांचा सातत्यानं पाणउतारा करणं हे सर्व कितपत योग्य आहे हाच प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. 

बिग बॉसच्या मंचावर विकेंड का वार, या सेशनदरम्यान अनेकदा सलमानचा त्याच्या रागावचा ताबा सुटला. 

सलमानच्या या कार्यक्रमाचे देशविदेशात चाहते आहेत. किंबहुना तो या कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.

या साऱ्यामध्ये त्याच्या भाषेवरचा ताबा सुटणं हे मात्र आता सर्वांनाच बोचत आहे. 

बिग बॉसच्या 15 व्या पर्वामध्ये सलमान प्रतीक सहजपाल नावाच्या स्पर्धकावर संतापला. 

रागावरील नियमंत्रण सुटल्यामुळं त्यानं प्रतीकला सर्वांसमोर अपशब्द वापरले. दोनदा त्याच्याकडून याची पुनरावृत्ती झाली. 

सलमानचं हे वागणं 'बीप'सह प्रसारित करण्यात आलं. एकिकडे सलमान स्वत: हा एक कौटुंबीक कार्यक्रम आहे असं म्हणताना दिसतो.

दुसरीकडे हाच सलमान स्पर्धकांशी अशा पद्धतीनं वागतो हे पाहता आता प्रेक्षकांनीही त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

आपल्याप्रती प्रेक्षकांचं असं मत पाहून आता तरी भाईजान सुधारणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.