मुंबई : नुकताच मिस वर्ल्ड पुरस्कार सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. मिस वर्ल्ड 2024 मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडला. या सोहळ्यात भारताने याआधी अनेकदा बाजी मारली आहे. आत्तापर्यंत भारताने तब्बल ६ वेळा हा खिताब जिंकला आहे. सगळ्यात पहिली मिस वर्ल्ड 1966 मध्ये रीटा फारिया हिने जिंकला होता. यानंतर हा खिताब ऐश्वर्या राय बच्चन, डायना हेडन, युक्ता मुखी, प्रियांका चोप्रा जोनास आणि मानुषी छिल्लर यांनी पटकावला. मात्र आज आम्ही तुम्हाला 1999 साली जिंकलेली मिस वर्ल्ड युक्ता मुखेचा एक असा व्हिडीओ दाखवणार आहोत जो पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे.
युक्ता इंदरलाल मुखी इंडियन सिविक एक्टिविस्ट आणि मिस वर्ल्ड 1999 हे किताब तिने पटकावले आहेत. ती हा किताब जिंकणारी चौथी भारतीय महिला आहे. यामध्ये मिस वर्ल्ड 2024 मध्ये तिला स्पॉट केलं गेलं. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यादरम्यान तिचा साडी लूक सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. तिचा हा लूक पाहून सगळेच हैराण होताना दिसत आहे. प्रोफेशनल लाईफप्रमाणेच तिची पर्सनल आयुष्यही अभिनेत्रीचं काही खास नव्हतं. खरंतर २००८ मध्ये न्यूयॉर्क बेस्ट बिजनेसमॅन आणि फाइनेशियल कंसल्टंट प्रिंस तुलीसोबत लग्न केलं होतं. यानंतर ती एका मुलाची आई झाली. मात्र २०१३ साली आलेल्या पीटीआई रिपोर्टनुसार अभिनेत्रीने पतीच्या विरोधात घरगुती हिंसाचा आरोप केला आणि एफआईआर दाखल केली. यानंतर दोघांच्या सहमतीने या दोघांचा घटस्फोट झाला आणि अभिनेत्री त्याच्या मुलासोबत भारतात परतली.
चाहते युक्ताला ओळखू शकले नाही
समोर आलेला युक्ताचा हा व्हिडीओ मिस वर्ल्ड 2024 कार्यक्रमावेळचा आहे. यावेळी ही अभिनेत्री तिथे कार्यक्रम पाहण्यासाठी आली होती. जिथे तिचे चाहते तिला ओळखू शकले नाही.मिस वर्ल्ड बनल्यानंतर युक्ता मुखीने तिच्या करिअरची सुरुवात अभिनेत्री म्हणून केली, पण ती स्वत:साठी कोणतेही नाव कमवू शकली नाही. सध्या युक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
संपूर्ण जगाला आपल्या सौंदर्याने वेड लावणारी युक्ता मुखी एक्टिंगमध्ये आपलं करिअर करण्यासाठी सज्ज झाली होती खरी पण यामध्ये ती फारशी यशस्वी होवू शकली नाही. मिस वर्ल्ड बनल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि तिने २००२ साली पहिल्यांदा सिल्वर स्क्रिनवर पाहिलं गेलं. युक्ताने बॉलिवूड अभिनेता आफताब शिवदासानीसोबत प्यासा सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. यानंतर तिने 'मेमसाहब', 'कठपुतली'सारख्या सिनेमात काम केलं.