अजय देवगणच्या 'रेड'वर शत्रुघ्न सिंंहा म्हणाले...

अभिनेता आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिंहा सध्या चित्रपटामध्ये फार अ‍ॅक्टीव्ह नसले तरीही ते अनेक बॉलिवूड सिनेमे पाहतात, नव्या पिढीतील कलाकारांना दाद देतात. नुकताच अभिनेता अजय देवगणचा 'रेड' सिनेमा भेटीला आला आहे. दमदार अभिनय आणि सत्यकथेवर आधारित 'रेड' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. अजय देवगण या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. नुकताच शत्रुघ्न सिंहानी हा चित्रपट पाहिला आहे.  

Updated: Mar 29, 2018, 05:36 PM IST
अजय देवगणच्या 'रेड'वर शत्रुघ्न सिंंहा म्हणाले...  title=

मुंबई : अभिनेता आणि भाजपा खासदार शत्रुघ्न सिंहा सध्या चित्रपटामध्ये फार अ‍ॅक्टीव्ह नसले तरीही ते अनेक बॉलिवूड सिनेमे पाहतात, नव्या पिढीतील कलाकारांना दाद देतात. नुकताच अभिनेता अजय देवगणचा 'रेड' सिनेमा भेटीला आला आहे. दमदार अभिनय आणि सत्यकथेवर आधारित 'रेड' चित्रपटाने बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. अजय देवगण या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. नुकताच शत्रुघ्न सिंहानी हा चित्रपट पाहिला आहे.  

ट्विटरच्या माध्यमातून केले कौतुक  

अजय देवगणच्या अभिनयाचे शत्रुघ्न सिंहानी कौतुक केले आहे. दरम्यान ट्विट करताना त्यांनी माझ्या काही इन्कम टॅक्स विभागाशी संबंधित ट्विटना पाहुन मला 'रेड' सिनेमाची आठवण झाली. या चित्रपटात वीरू देवगणचा मुलगा आणि आपला लाडका अभिनेता अजय देवगणचा अभिनय अतिशय उत्तम आहे. 

 

 

सौरभ शुक्लाने केले कौतुक  

रेड चित्रपटातील अजय देवगणच्या भूमिकेचं सौरभ शुक्लानेही कौतुक केले आहे. अजयसोबतच रेड चित्रपटामध्ये इलियाना डिक्रुज झळकली आहे. या चित्रपटात अजय देवगणने आयकर विभाग प्रमुखाची भूमिका साकारली आहे.